आई- वडिलांना तुमच्या दारु- सिगारेट पिण्याच्या सवयीबद्दल माहीत पडणे हे कोणासाठीही एका वाईट स्वप्नपेक्षा कमी नाही. यामुळे अनेक तरुण आपली दारू- सिगारेटची सवय आई-वडिलांना कळू नये यासाठी प्रयत्न करत असतात. पण तुम्ही फक्त विचार करा की, तुम्ही फॅमिली ग्रुपवर चॅट करत आहात किंवा एखाद्याला मेसेज करत आहात आणि यावेळी तुमच्याकडून चुकून एखादा न टाकण्यासारखा फोटो गेला, तर काय होईल. विचार करुनचं अंगाच पाणी झालं ना! पण खरोखर एका तरुणाच्या बाबतीत हे घडले आहे. ट्विटरवर सानिया धवन नावाच्या एका तरुणीने तिच्या भावाचा हा प्रताप सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या भावाने फॅमिली ग्रुपवर चुकून एका बिअर कॅनचा फोटो शेअर केला होता. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये तुम्ही पाहू शकता, ट्विटर युजर सानियाचा भाऊ जो मुंबई इंडियन्सचा मोठा फॅन आहे. त्याने काल मुंबई इंडियन्स जिंकल्याचा आनंद साजरा करताना एक बीअर कॅनचा फोटो पोस्ट केला. यासोबत त्याने मेसेज केला की, ‘मुंबई फॉर द विन… लेसगो’. हा फोटो तिच्या भावाला कोणाला पाठवायचा होता हे माहित नाही पण तो चुकून फॅमिली ग्रुपमध्ये जातो आणि होत्याच नव्हत होऊन बसत. या मेसेजनंतर दोन मिनिटांनी लगेच सानियाच्या वडिलांनी फोटोवर ‘काय’ असा प्रश्न विचारला. यानंतर एका मिनिटाने सानियाची आई देखील विचारते ‘तू बियर पितोस का?’

Karan Aujla live show video
भर कॉन्सर्टमध्ये चाहत्याने फेकून मारला बूट, ‘तौबा तौबा’ फेम गायकानं केलं ओपन चॅलेंज, पाहा Video
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
MS Dhoni opened up about his bond with Virat
MS Dhoni : ‘वयाचा फरक असला तरी, मी त्याचा…’, विराटबरोबरच्या नात्याबद्दल माही पहिल्यांदाच झाला व्यक्त, VIDEO व्हायरल
Naveen Ul Haq Teased with Virat Kohli video
Naveen Ul Haq Virat Kohli : विराट कोहलीच्या रील्समुळे नवीन उल हक वैतागला, VIDEO होतोय व्हायरल
Hersh Goldberg Polin Hamas hostage
हमासने अपहरण केलेल्या तरुणाचे पालक डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शनच्या मंचावर, सुटकेची केली विनंती; कोण आहे हर्ष गोल्डबर्ग-पॉलिन?
What happened to South Asian University after the Chomsky case
‘चॉम्स्की प्रकरणा’तून साउथ एशियन युनिव्हर्सिटीचे काय झाले?
Natasa Stankovic shares a reflective message expressing gratitude
Natasa Stankovic : हार्दिक-जास्मिनच्या डेटिंगच्या चर्चेदरम्यान नताशाने शेअर केली इन्स्टा स्टोरी; म्हणाली, ‘योग्य वेळ आल्यावर देव…’
Vinesh Phogat Appeal Rejection by CAS Bajrang Punia Post Goes Viral
Vinesh Phogat: ‘१५-१५ रूपयांत मेडल खरेदी करा…’ विनेश फोगटची याचिका फेटाळल्यानंतर बजरंग पुनियाची धक्कादायक पोस्ट, पीटी उषानेही सुनावलं

सकाळपासून उपाशी, एक बासरी विकण्याची वाट पाहतोय; गरीब विक्रेत्याचा भावनिक Video इंटरनेटवर व्हायरल

ग्रुपवर भावाने केलेले हे प्रताप पाहून बहिण सानिया त्याला पर्सनल मेसेज करुन विचारते की, ग्रुपमधील बिअर कॅनचा फोटो तू का डिलीट करत नाहीये? त्यावर तो रिप्लाय करतो की, त्याने फोटो Delete for everyone करण्याऐवजी delete for me केलाय. यामुळे मॅच जिंकल्याचा आनंद साजरा करण्याचा नादात तो चांगलाच फसतो. आता हे मजेदार व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, माझ्या भावाने ‘हे’ फॅमिली ग्रुपला पाठवले आहे. ही पोस्ट शेअर केल्यापासून आता १.१ मिलियनहून अधिक वेळा पाहिली गेली आहे, ज्यामध्ये अनेक मजेशीर कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट करत विचारले की, ‘तो जिवंत आहे का?’ तर दुसऱ्या एकाने सल्ला दिला की, ‘तो म्हणू शकतो की, तो मुंबई इंडियन्सला सपोर्ट करत होता आणि कॅन त्याच्या मित्राचा होता’. यावर तिसऱ्याने लिहिले की, ‘व्हॉट्सअॅपवर डिलीटचे दोनच पर्याय का आहेत? माझ्यासाठी डिलीट हा एक स्कॅम आहे, आम्ही सुद्धा अनेक वेळा पकडले गेले आहोत’.