संपूर्ण भारतात सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. वायव्य भारताला उष्णतेचा अधिक फटका बसत आहे. आग ओकणाऱ्या कडक ऊन्हातही देशाचे जवान आपले कर्तव्य बजावत असतात. राजस्थानच्या बिकानेरमधील वाळवंटातला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सीमा सुरक्षा दलाचा (BSF) एक जवान तापलेल्या वाळूवर पापड भाजताना दिसत आहे. बिकानेर हा राजस्थानमधील सर्वात उष्ण जिल्हा आहे. यावर्षी बिकानेरमधील तापमान ४६ अंश सेल्सियसच्याही पुढे गेल्याचे दिसले.

फ्रंटल फोर्स या एक्स अकाऊंटवरून सदर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आता इंटरनेटवर हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये बीएसएफ गणवेशातील एक जवान दिसत आहे. प्रचंड उकाड्यामुळे त्याने डोकं आणि चेहरा व्यवस्थित झाकलेला दिसतो. हातात बंदूक घेतलेला हा जवान वाळूवर पापड ठेवतो आणि वाळूने पापड झाकतो. काही सेंकद थांबल्यानंतर पापडावरील वाळू बाजूला सारून तो पापड बाहेर काढतो. यावेळी पापड पूर्णपणे भाजलेला दिसतो. भाजलेला पापड सदर जवान कडाकडा पापड मोडून दाखवतो.

Kyna Khare, record,
कयना खरे… छोटीशी जलपरी
Haris Rauf Fight Video Viral
‘हा भारतीय असणार…’ असं म्हणत हारिस रौफ चाहत्यावर गेला धावून, संतापलेल्या हारिसने पत्नीलाही ढकललं; VIDEO व्हायरल
jitendra awhad
पवई भीमनगरमध्ये पोलिसांची दडपशाही? बेदम मारहाणीचा व्हिडीओ जितेंद्र आव्हाडांकडून पोस्ट; म्हणाले, “हा रुमाल बांधलेला माणूस…”
a young man hides wine bottle in secret locker of vehicle
पठ्ठ्याने गाडीमध्ये ‘या’ सीक्रेट जागी लपवल्या दारूच्या बाटल्या; VIDEO पाहून डोकं धराल
a poor child feeding ice cream to the street dog
“हा जगातील सर्वात श्रीमंत” गरीब चिमुकल्याने कुत्र्याला खाऊ घातली आइसक्रीम, VIDEO होतोय व्हायरल
young boy in pune enjoys Rain
“पुणेकरांचा नादखुळा!” पावसाचा आनंद लुटणाऱ्या पुणेरी तरुणाचा व्हिडीओ बघाच, पोटधरुन हसाल
Leopard Attack in Coinbatore
रात्रीच्या अंधारात दोन डोळे चमकले, बिबट्यानं थेट भिंतीवर झेप घेतली अन्…, Video व्हायरल!
prajwal revanna
महिन्याभरानंतर भारतात परतलेल्या प्रज्वलला विमानतळावरच अटक, व्हिडिओतील आवाजाचे नमुने गोळा करणार?

“आपल्या जवानांना सलाम. बिकानेरच्या तप्त वाळूवर जवानाने भाजला पापड. या कडक उन्हातही मातृभूमीच्या रक्षणार्थ आपले जवान तत्पर आहेत”, असे कॅप्शन फ्रंटल फोर्सने व्हिडीओ पोस्ट करताना लिहिले आहे.