अमेरिकेची मल्टिनॅशनल फास्टफूड कंपनी असलेल्या ‘बर्गर किंग’नं प्रिन्स हॅऱी यांना पार्ट टाइम जॉबची ऑफर दिली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडरवरुन मंगळवारी ‘बर्गर किंग’ने ही ऑफर दिली. त्यानंतर, नेटकऱ्यांनी लगेचच हे ट्विट रिट्विट करीत ट्विटरवर अक्षरश: धुमाकूळ घातला.

इंग्लंडच्या राजघराण्याचे वारस असलेल्या प्रिन्स हॅऱी आणि त्यांची पत्नी मेगन मार्केल यांनी आपले शाहीपद सोडून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी जीवन जगण्याची नुकतीच घोषणा केली होती. यापार्श्वभूमीवर कामाच्या शोधात असलेल्या प्रिन्स हॅरी यांना ‘बर्गर किंग’ने कामाची ऑफर दिली. ‘बर्गर किंग’ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट केले की, “हॅरी, हे राजघराणं आपल्याला पार्ट टाइम पोस्ट ऑफर करीत आहे.” ‘बर्गर किंग’च्या या ट्विटनंतर ट्विपल्सनी तत्काळ यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. या पोस्टला ट्विटरवर ६ हजारांहून अधिक जणांनी लाईक केले आहे.

‘बर्गर किंग’च्या या ट्विटला रिट्विट करताना काही ट्विपल्सनी मजेशीर सल्लेही दिले आहेत. एका युझरने ‘बर्गर किंग’ला आपल्या या विचारांना निर्दयी म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने या फास्ट फूड साखळीच्या कंपनीने इंटरनेटला जिंकले आहे, असे म्हटले.

दरम्यान, अर्जेंटिनातील ‘बर्गर किंग’च्या एका शाखेने गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे ट्विट करीत या राजपुत्र आणि त्याच्या पत्नीला पार्ट टाइम जॉबची ऑफर दिली होती. या ट्विटमध्ये ‘बर्गर किंग’ने म्हटले होते की, “प्रिय ड्यूक आपण आपलं पहिलं काम शाहीपद सोडल्याशिवायही करु शकता. दुसऱ्या एका ट्विटमध्ये ‘बर्गर किंग’नं म्हटलं होतं की, “जर आपण नोकरी करु इच्छित असाल तर आमच्याकडे आपल्यासाठी एक नवा मकुटू आहे.”

महाराणी एलिझाबेथ यांनी नातवाच्या स्वतंत्र भविष्यासाठी दिला आशिर्वाद

इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ यांनी आपला नातू प्रिन्स हॅऱी आणि त्याची पत्नी मेगन यांना त्यांच्या स्वंतत्र भविष्यासाठी प्रार्थना करीत आशिर्वाद दिले आहेत. ९३ वर्षीय महाराणीने म्हटले की, “मी आणि माझे कुटुंब हॅरी आणि मेगन यांच्या नव्याने स्वतंत्रपणे जीवन जगण्याच्या इच्छेचे पूर्णपणे समर्थन करतो आणि त्यांना आशिर्वाद देतो”