चोरी करण्यासाठी चोर काय शक्कल लढवतील सांगता येत नाही. आपले चोरीचे काम योग्य पद्धतीने पार पडावे आणि नंतर आपण पकडलेही जाऊ नये यासाठी त्यांना बरेच नियोजन करावे लागते. आणि हे नियोजन कधी चुकलेच तर मग काही खरे नाही. चीनमध्ये एका चोराने सीसीटीव्ही कॅमेरापासून लपण्यासाठी एक अतिशय अनोखी शक्कल लढवली आहे. सीसीटीव्ही कॅमेराच फोडून टाकणे किंवा त्यावर काही फडके बांधणे इथवर ठिक आहे. पण या चोराने काय केले पाहा.

एका इमारतीत चोरी करण्यासाठी जात असताना या चोराला इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही लावल्याचे लक्षात आले. मग त्याने थेट भूताचाच वेश घेतला. मात्र हा वेश घेताना त्याच्या दुर्देवाने त्याचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. त्यानंतर हा पांढऱ्या रंगाचा भूताचा वेश करुन जाताना हा व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसत आहे. आपला चेहरा आणि आणि शरीराचा जास्तीत जास्त भाग लपविण्याचा प्रयत्न हा चोर करत असल्याचे कॅमेरात कैद झाले आहे. मात्र या चोराला पकडण्यात इमारतीतील लोकांना यश आले असून हा चोर इमारतीतील एकही गोष्ट चोरु शकला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.