Maharashtra deputy cm Eknath Shinde Offers Help : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ चर्चेत येतात. काही व्हिडीओ इतके व्हायरल होतात की त्याची चर्चा सर्वत्र होते. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओमध्ये एक आई तिच्या ३ वर्षांच्या बाळाला दगडाला बांधून उन्हात मजूरी करताना दिसली होती. जेव्हा तिला युट्युबर शितल यांनी मुलाच्या यासंदर्भात विचारले, तेव्हा आईने सांगितले होते की त्याला बोलता येत नाही. दवाखान्यात जायला पैसे नाही, असे सांगितले होते. पण आता या चिमुकल्याच्या मदतीला थेट उपमुख्यमंत्री धावून आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी थेट या चिमुकल्याच्या कुटुंबाला मदत जाहीर केली आहे. सध्या सोशल मीडियावर या चिमुकल्याचा तो जुना व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी चिमुकल्याला मदत केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार मानत आहे.

व्हायरल व्हिडीओ

चिमुकल्याला दगडाला बांधून आई करायची भर उन्हात मोलमजुरी

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका मोलमजुरी करणाऱ्या आईने आपल्या तीन वर्षांच्या चिमुकल्या बाळाला दगडाला बांधून ठेवलं आहे. जेव्हा युट्युबर शितल या संदर्भात आईला विचारते तिचे उत्तर ऐकून कोणीही भावूक होईल.
या चिमुकल्याची आई सांगते की त्याला बोलता येत नाही. जेव्हा या मुलाला दवाखान्यात दाखवलं नाही का? असा प्रश्न युट्युबर शितल विचारते तेव्हा आई पैसे नाहीत त्यामुळे दवाखान्यात त्याला नेले नाही असे सांगते. ” हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल.
या व्हिडीओमध्ये युट्युबर शितल महाराष्ट्र शासन सार्वजानिक विभागास याकडे लक्ष देण्याची विनंती करते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, जाहीर केली मदत

या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. मुलाचं ऑपरेशन करणार असल्याचं ते म्हणाले. बाकी मुलं जसे नॉर्मल असतात, तसे आम्ही सुद्धा त्या मुलाला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. ते म्हणाले, “ऑपरेशनची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे. आज त्या परिवाराला बघून समाधानही वाटते आम्ही त्या परिवारासाठी काहीतरी करू शकणार.”