cab driver doing dirty things in front of student: ऑनलाइन अॅपवरून कॅब बुक करत असाल तर महिलांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज सध्या आहे. याचं कारणही तसंच आहे. कॅब चालकांच्या कृत्याच्या अनेक घटना कानावर येत असतात. त्यातच दिल्लीतील एक घटना समोर आली आहे. कॉलेजला उशीर झाला म्हणून या विद्यार्थिनीने ऑनलाइन अॅपवरून कॅब बुक केली. काही वेळाने कॅब आली. बसताना कॅब चालकाने तिला पुढच्या सीटवर बसायला सांगितले, मात्र या तरूणीने नकार दिला आणि ती मागच्या सीटवर बसली. सुरूवातीला काही वेळ गेल्यानंतर या चालकाने तरूणीशी विचित्र संवाद सरू केला.
या तरूणीने आरोप केला की, आधी बोलत बोलत या चालकाने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि मग तिच्यासमोर अश्लील चाळे करू लागला. या चालकाचे असे कृत्य पाहून ती तरूणी प्रचंड घाबरली. त्यानंतर वाटेत एका ठिकाणी कॅब थांबल्यावर तरूणीने उतरून थेट पोलीस स्टेशन गाठले. तिने पोलिसांत तक्रार केल्यानंतर आरोपी कॅब चालकाला पोलिसांनी अटक केली.
ही घटना सोमवारी घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत बोलताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित मुलीच्या तक्रारीच्या आधारे या आरोपीला अटक केली गेली आणि त्याची ओळख लोम शंकर अशी असल्याचे कळले.
या चालकाची कारही जप्त करण्यात आली आहे. विद्यार्थिनीने सांगितल्याप्रमाणे, या चालकाने तिला घाणेरड्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि अश्लील चाळे करू लागला. नॉर्थ कॅम्पसजवळ कार थांबवल्यावर घाबरलेली ही पीडित तरूणी लगेचच उतरली. दिल्ली युनिव्हर्सिटीत दोनच महिन्यांपूर्वी या तरूणीने अॅडमिशन घेतलं आहे. या काळात तिला असा अनुभव आला जो तिला आयुष्यभर त्रास देईल. ही बातमी पसरताच सोशल मीडियावरही लोक बोलू लागले आहेत. पुन्हा कोणी असे कृत्य करू नये अशी शिक्षा या चालकाला द्यावी अशी मागणी सोशल मिडिया युजर्स करत आहेत.