करोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये आता जगातील अनेक देशांनी लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. अमेरिका, युरोपीयन देशांबरोबरच भारतामध्येही लसीकरणाची मोहीम सुरु करण्यात आली आहे. सध्या करोनाविरुद्ध लढण्यासाठी नियमांचं पालन करण्यासोबतच लसीकरण हा एकमेव प्रभावशाली मार्ग असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. असं असतानाही अनेकजण लसीकरण करुन घेण्यासाठी टाळाटाळ करत आहेत किंवा घाबरत आहेत. भारतामध्येही मागील आठवड्यात उत्तर प्रदेशमधील एका गावामध्ये लसीकरणासाठी सरकारी अधिकारी गेले असता गावकऱ्यांनी नदीत उड्याकल्याची हातमी समोर आली होती. बरं लसीकरणाला केवळ भारतातच विरोध होतोय असं नाही तर अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्येही लसीकरणाला विरोध केला जातोय. येथे अनेकांनी लस टोचून घेण्यात फारसा उत्साह दाखवलेला नाही. त्यामुळेच आता सरकारनेच लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी लॉटरीची अनोखी योजना सुरु केलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेतील कॅलिफॉर्निया राज्याने जास्तीत जास्त नागरिकांनी लसकीरणामध्ये सहभागी व्हावं म्हणून लॉटरीची योजना सुरु केली आहे. येथे लस घेणाऱ्यांना लॉटरीचं तिकीट दिलं जाईल. याअंतर्गत लस घेणारे लोक हे ११६.५ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच १० कोटी रुपये जिंकण्याच्या स्पर्धेत सहभागी होतील. लॉटरीचे पैसे जिंकण्याच्या अमिषाने का असेना पण जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करुन घ्यावं या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आलीय. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

कॅलिफॉर्नियाचे गव्हर्नर गॅवीन न्यूजॉम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना १० लोकांना प्रत्येकी १० कोटी रुपयांची रक्कम जिंकण्याची संधी या योजनेमध्ये आहे. तसेच लसीकरण करुन घेणाऱ्या ३० जणांना प्रत्येकी ५० हजार अमेरिकन डॉलरचे बक्षीस दिलं जाणार आहे. याशिवाय २० लाख लोकांना ५० डॉलर्स दिले जाणार आहेत. एका आकडेवारीनुसार येते आतापर्यंत लसीकरणासाठी २७ लाख लोकांनी नोंदणी केली आहे. अमेरिकेतील इतर राज्यांनीही लोकांनी लसीकरणामध्ये सहभागी होण्यासाठी बक्षीसांची घोषणा करण्यास सुरुवात केलीय. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये अमेरिकेचा समावेश आहेत. अमेरिकेत करोनामुळे पाच लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. लसीकरणाअंतर्गत दोन्ही डोस घेतलेल्यांना मास्क घालण्याची गरज नसल्याचं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: California launches incentive program for covid vaccinations scsg
First published on: 28-05-2021 at 12:23 IST