अनेक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा असतो असं म्हणतात. म्हणजेच एकच गोष्ट दोन वेगवेगळ्या पद्धतीने पाहिल्यास तिच्यामधून वेगळा अर्थ निघू शकतो. अनेकदा एखाद्या गोष्टीकडे पाहताना दिसतं तसं नसतं याचा प्रत्यय येतो. अनेकदा या ऑप्टीकल इल्यूजनमुळे (म्हणजेच दृष्टीचा होणार भ्रम) गोंधळ उडतो. सध्या इंटरनेटवर अशाच एका फोटोची चर्चा आहे. तुम्हाला तुमच्या बुद्धीला चालना द्यायची असेल किंवा काहीतरी आव्हानात्मक ऑनलाइन चॅलेंज वगैरे स्वीकारायचं असेल तर ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच स्मृती भ्रमाशीसंदर्भातील चॅलेंज हा उत्तम पर्याय आहे. सध्या नेटकरी अशाच एका चॅलेंजमध्ये अडकल्याचे चित्र इंटरनेटवर दिसत आहे. नक्की पाहा >> कोणी म्हणतं ब्लॅक ब्यूटी तर कोणी बगीरा… खरोखरच या फोटोंवरुन तुमची नजर हटणारच नाही भारतीय वन विभागाच्या सेवेत असणारे अधिकारी प्रविण कासवान यांनी ट्विटवर दोन झेब्रा समोरासमोर उभे असल्याचा फोटो शेअर करत नेटकऱ्यांना चॅलेंज दिलं आहे. "चला या दोघांपैकी कोणता झेब्रा पुढे आहे हे कोण सांगू शकतं पाहुयात. हा फोटो सरोश लोधी या माझ्या मित्राने क्लिक केला असून त्यानेच मला यासंदर्भातील प्रश्न विचारला आहे," अशी कॅप्शन दिली आहे. तुम्हीच पाहा हा फोटो आणि सांगा कोण पुढे कोण मागे.. Let’s see who can tell which Zebra is in front. Clicked & asked by friend @saroshlodhi. pic.twitter.com/RNAMBJrk1K — Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) July 8, 2020 अर्थात आता असं चॅलेंज आल्यावर या पोस्टवर नेटकऱ्यांच्या उड्या पडल्या. कोणी खरोखरच अंदाज व्यक्त केला तर कोणी डोकं गरगरायला लागल्याचं सांगत हे आम्हाला सांगणं शक्य होणार नाही असं मत व्यक्त केलं. उजवा Right one — Savan0743 (@savan0743) July 8, 2020 शंभर टक्के डावा Its the left one.100% — Dakuudaddy (@dakuudaddy) July 9, 2020 नाही नाही उजवा. The one on the right, I think. — Moeses KIIINT (@MoesesKIIINT) July 9, 2020 नाही डावाच Left one — Ashish (@Ashishgupta0123) July 8, 2020 काही लोकांनी तर आपल्या उत्तराचे स्पष्टीकरणही दिलं. हे पाहा. सावली पाहून वाटत आहे की Sir the Zebra on the left is in front. I told this because of the shadow — Satwik Gupta (@SatwikGupta17) July 10, 2020 डावा वाटतोय कारण. The left one, going by the folds on his neck (probably because his head is tilted to his right). The right one doesn't have folds on the neck indicating his face is hid straight behind the left zebra's face. — Keerthi Priya (@Keerthi56546991) July 8, 2020 कान पाहिल्यावर असं दिसत आहे की. The Left Zebra is in front. Look at the orientation of ears. — SankAt (@1_sanket) July 8, 2020 सावली पाहता From the shadows I guess the one on the left is. No, wait. — Kaveri (@ikaveri) July 8, 2020 केसांकडे लक्ष दिल्यास. Left on. Close look of hairline on neck portion confirms — Raghv Pandey (@PandeyRaghv) July 8, 2020 याने जरा जास्तच संशोधन केलं An artificial intelligence app that uses AI for depth analysis says the right one is in the front. pic.twitter.com/5dgGqqSInp — Sai (@ssaig) July 8, 2020 काहींनी तर नादच सोडून दिला आणि म्हणून लागले डोळे दुखू लागले झेब्रा पाहून पाहून. ही पाहा काही उदाहरणे. माझे डोळे. OMG ! it's hurting my delicate eyes. — Vamsikrish Na (@vamsikrish_here) July 9, 2020 आधीच २०२० मध्ये कमी प्रश्न आहेत त्यात हा एक as if 2020 hasn't been hard enough to figure out. wtf man I keep changing my answer. — elizabethany [eb] (@luvelizabethany) July 9, 2020 डावा आणि उजवा पण कोणाचा? phle to yeh mere left ya aapka left kyuki jo mera left wo aapka right h jo mera right h wo aapka left — आदिमानव (@NIT3SHPAL) July 8, 2020 काहींना तर हा फोटो एडिट केलेला वाटला Amazed It's created through graphic designing so it's really difficult to guess but it's left I hope — Jyoti Saini Si (@jyotiartists) July 7, 2020 नक्की पाहा >> एकमेवाद्वितीय! भारतामध्ये पहिल्यांदाच आढळला ‘हा’ सुंदर प्राणी; पाहून व्हाल थक्क हा फोटो काढला कसा? वाइल्ड लाइफ फोटो ग्राफर असणारे सरोश लोधी यांनी हा फोटो क्लिक केला आहे. "आफ्रिकेमधील मसाई मारा येथील जंगलांमध्ये झेब्रांच्या एका कळपाचे काही फोटो मी काढत होतो. अनेक झ्रेबा असल्याने मी त्यांचे वेगवेगळ्या शैलीतील फोटो काढण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचवेळी दोन झेब्रा एकमेकांकडे समोरासमोर चालत येताना दिसले. या दोघांमध्ये आता काहीतरी संवाद होईल असं वाटून मी फोटो क्लिक करत राहितो त्याचवेळी हा फोटो मी क्लिक केला. हे झेब्रा ज्या पद्धतीने उभे आहेत त्यामुळे हे इल्युजन तयार झालं आहे," असं लोधी या फोटोबद्दल बोलताना सांगतात. नक्की वाचा >> ऑप्टीकल इल्युजनचे आणखीन एक उदाहरण, हा फोटो रंगीत की ब्लॅक अँड व्हाइट?; सांगा पाहू बरं कोणता झेब्रा पुढे हे उत्तर तुम्हाला सापडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा.