पंजाबी भांगडा सुरू झाला अन् आपले हात पाय थिरकायला लागले नाही तर नवलंच म्हणावे लागले. आता आपण भारतीयांची भांगाडा सुरू झाल्यावर ही स्थिती असते मग कॅनेडिअयन महापौर त्याला अपवाद कसे बरं ठरतील. सध्या सोशल मीडियावर कॅनेडियन महापौरांची खूपच चर्चा आहे. त्यांनी चक्क एका पंजाबी लेखकाडून पगडी कशी बांधायची हे शिकून घेतले पण त्याच्यासोबत भांगडा देखील केला. याचा व्हिडिओ सध्या युट्युब, फेसबुकवर व्हायरल होत आहे.
वाचा : फक्त भिका-यांनाच देतो ‘हा’ इंजिनिअर नोकरी
कॅनडातील व्हाइटहॉर्स येथील महापौर डॅन कुर्टीस यांची सध्या खूपच चर्चा होत आहे. लेखक गुरपीत पंढेर आणि त्यांच्या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुरपीत यांच्याकडून पंजाबी पगडी बांधण्याचे धडे त्यांनी घेतले. गुरपीत यांनीही त्यांना पगडी कशी बांधायचे हे शिकवले. पगडी बांधून झाल्यावर डॅन यांनी त्यावर भांगडाही केला. गुरपीत याने याचा व्हिडिओ फेसुबकवर शेअर केला. आणि अल्पावधीत तो व्हायरलही झाला.
वाचा : बहारिनचे दिलदार परराष्ट्रमंत्री, मोलकरणीचे मानले आभार
भांगडा करतानाचा व्हिडिओ पाहून अनेकांनी आपल्याला फोन केले अशी प्रतिक्रियाही डॅन यांनी दिली. हा व्हिडिओ बघून कॅनडातूनच नाही तर भारत, अमेरिका, जपानमधून आपल्याला फोन केले आणि ईमेल्स केले असल्याचेही त्यांनी सांगितले. कॅनडॅमध्ये शीख समाजाची संख्या अधिक आहे. येथल्या कॅनडिअन संस्कृतीत ते अगदी मिसळून गेले आहेत. पण गेल्या काही वर्षात येथल्या शीख बांधवांना वर्णभेद आणि वंशद्वेषालाही समोरे जावे लागत आहेत. त्यांच्यावर हल्लेही झाले आहेत पण शीख समाजात असे मिसळून आपण वंशद्वेश कमी करू अशी प्रतिक्रिया डॅन यांनी दिली.