रात्रीच्या अंधारात अचानक समोर बिबट्याला पाहिल्यावर कोणालाही धक्का बसेल. मात्र जोधपूरमध्ये अगदी आश्चर्यचकित करणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामान्यपणे बिबट्याने लोकवस्तीमध्ये शिरुन पाळीव किंवा भटक्या कुत्र्यांची शिकार करणं हे काही नवीन राहिलेलं नाही. अगदी मुंबईतील आरे कॉलीनीमध्ये अनेकदा बिबट्या सीसीटीव्हीमध्ये दिसतो. जोधपूरमध्ये मात्र एका बिबट्याला समोर पाहताच भटक्या कुत्र्याला हार्ट अटॅक आला आणि तडफडून त्याचा मृत्यू झालाय. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

आधी ही दोन भटकी कुत्री या बिबट्याकडे धावली मग बिबट्याने त्यांच्याकडे धाव घेतली मात्र एकाही कुत्र्याला त्याने स्पर्श न करता तिथून पळ काढला, पण बिबट्याच्या रुपात मृत्यूला समोर पाहून या दोन कुत्र्यांपैकी एकाला हार्ट अटॅकचा झटका आला आणि त्याने प्राण सोडला. नक्की काय घडलं पाहुयात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.