Pigeons On A Flight Video Viral : उड्डाणाच्या आधी विमानाच्या अनेक सुरक्षा तपासण्या केल्या जातात. तसेच हवामानाचा अंदाज घेतला जातो. यात विमानाची तांत्रिक तपासणी, वजन आणि संतुलन मूल्यांकन, धावपट्टीची स्थिती, पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) यांच्यातील संपर्क, प्रवाशांसाठी सुरक्षा सूचना आणि आपत्कालीन तयारी. या सर्व गोष्टी तपासून झाल्यानंतरच विमान उड्डाणासाठी तयार होते. मात्र, एवढी सर्व काळजी घेऊनही एका विमानात अशी काही घटना घडली की पाहून प्रवासीदेखील चकित झाले. उड्डाणापूर्वी एका विमानात चक्क कबुतराने एन्ट्री घेतली, ज्यानंतर प्रवाशांनी त्याला पकडण्यासाठी अशी काही मेहनत घेतली की पाहून तुम्हाला हसू येईल. सध्या या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अमेरिकेत एक विमान उड्डाणासाठी सज्ज झालं होते, पण एका कबुतरामुळे विमानातील वातावरणच बदलून गेले. अमेकिरेतील मिनियापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मॅडिसन, विस्कॉन्सिनला जाणाऱ्या डेल्टा एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये ही घटना घडली. उड्डाण करण्यापूर्वी विमानात एक कबुतर उडताना दिसले, ज्याला एका प्रवाशाने जॅकेटच्या मदतीने पकडण्याचा प्रयत्न केला.

टॉम को नावाच्या एका प्रवाशाने ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, कबुतर विमानातील केबिनमध्ये उडत होते, यावेळी एक प्रवासी त्याच्या जॅकेटच्या मदतीने त्याला रोखण्याचा प्रयत्न करतो. यावेळी कबुतर जॅकेटला धडकतो आणि खाली पडतो. यानंतर पुन्हा उडून पुढे जातो. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. ज्या प्रवाशाच्या अंगावर कबुतर पडले तो अचानक ओरडू लागला, त्यामुळे इतर प्रवासीदेखील मागे वळून बघू लागले.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, विमान उड्डाण सुरू होण्यापूर्वीच विमानात सामान ठेवणाऱ्या एका हँडलर्सने कबुतराला पकडले होते, परंतु जेव्हा विमान धावपट्टीकडे जाऊ लागले तेव्हा अचानक दुसरे कबुतर विमानात शिरले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कबुतरामुळे उड्डाणाला ५६ मिनिटे उशीर झाला. या घटनेवेळी डेल्टा एअरलाइन्सचे एअरबस ए२२० विमानात ११९ प्रवासी आणि पाच क्रू मेंबर्स होते. डेल्टा एअरलाइन्सने म्हटले आहे की, “उड्डाण करण्यापूर्वी विमानातून दोन पक्षी सुरक्षितपणे काढून टाकणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या आणि प्रवाशांच्या सतर्कतेचे आम्ही कौतुक करतो. प्रवासास झालेल्या विलंबाबद्दल आम्ही आमच्या ग्राहकांची माफी मागतो.