Shocking Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण आजच्या या काळात काही लाइक्स आणि कमेंट्ससाठी लोक आपली हद्द पार करू लागले आहेत. त्यात तरुणांची आणि लहान मुला-मुलींची संख्या जास्त आहे.
आताच्या पिढीतील काही मुलं जगाचं भान विसरून आपली मर्यादा ओलांडू लागले आहेत. पण या सगळ्यात कुठेतरी त्यांचे आई वडीलही त्यांच्यावर संस्कार करायला चुकतात का असा प्रश्न अनेकांना पडतो. पण सगळ्याच गोष्टीला आई वडिलांना दोष देणंही चुकीचं वाटतं. पण सध्या एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एका लहानशा बाळाने धक्कादायक कृत्य केलं आहे. नेमकं काय घडलंय, जाणून घेऊ या…
सिगारेट ओढताना व्हिडीओ व्हायरल (Child Smoking Cigarette Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक लहान बाळ पायऱ्यांवर बसून सिगारेट ओढताना दिसत आहे. त्याचा व्हिडीओ कोणीतरी रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिगारेट ओढत त्याचे धूर सोडताना हा चिमुकला दिसतोय. हा धक्कादायक प्रकार पाहून अनेकांनी यावर राग व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @kalyani.lifex या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल १. ५ मिलियन जास्त व्ह्यूज आले आहेत. तसंच “मुलंजे बघतात तेच शिकतात, त्यांच्यासमोर कोणतीही अशी गोष्ट करू नका जी त्यांच्यासाठी जीवघेणी आहे” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “त्याला कोणी सिगारेट पेटवून दिली? व्हिडीओसाठी कोणीतरी फालतू कृत्य केलं आहे”, तर दुसऱ्याने “व्हिडीओसाठी कोणत्या थराला उतरले आहेत हे लोक, निष्पाप मूलाचाही फायदा घेत आहेत” अशी कमेंट केली. तर एकाने “असे आई बाप नसले तरी चालतील” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला ”पोटच्या मुलाला तरी सोडा”