टीव्ही आणि मोबाईल ही लहान मुलांच्या मनोरंजनाची सर्वात लोकप्रिय उपकरण आहेत. अनेक लहान मुलांना तर जेवताना डोळ्यासमोर टीव्ही आणि मोबाईल लागतोच. जर त्यांना आपण टीव्ही बघू न देता जेवायला सांगितलं तर ते जेवायला नकार देतात. अशा प्रकारच्या अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र,लहान मुलांचा वाढता स्क्रीन टाईम आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर होणाऱ्या दुष्परिणामांमुळे पालक चिंतेत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलांची टीव्ही पाहण्याची सवय मोडावी म्हणून ते त्यांना कधी ओरडतात तर कधी बाहेर फिरायला घेऊन जायचं आमिष देखील दाखवतात. पण केवळ सांगून ऐकतील लहान मुलं कसली? त्यामुळे पालकांना देखील कधी कधी कठोर बनावं लागत आणि मुलांना फटके द्यावे लागतात. मात्र, सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पालक आपल्या मुलाची टीव्ही पाहण्याची सवय टीव्ही पाहायला लावून मोडत आहेत. कदाचित तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. चीनमधील एका जोडप्याने आपल्या मुलाला शिक्षा म्हणून जबरदस्तीने रात्रभर टीव्ही पाहायला लावल्याची घटना उघडकीस आली आहे.

हेही वाचा- ज्योतिषाचा सल्ला शेतकऱ्याला पडला महागात, सापाला जीभ दाखवली अन् आयुष्यभरासाठी गमावला…

नेमकं काय घडलं ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील आई-वडील आपल्या ८ वर्षाच्या मुलाला घरात ठेवून बाहेर काही कामानिमित्त घराबाहेर जाताना आपल्या मुलाला अभ्यास करायला सांगतात. शिवाय सर्व काही आवरुन ८.३० पर्यंत झोप असं सांगून ते घराबाहेर पडतात. मात्र, मुलगा आई-वडील बाहेर गेल्यानंतर टीव्ही पाहत बसतो. तो टीव्ही पाहण्यामध्ये एवढा रमतो की त्याला वेळेचं भानच राहत नाही. त्यामुळे आई-वडील बाहेरुन फिरुन घरी आले तरी तो वेळी तो टीव्हीसमोरच होता. त्याला एवढा वेळ टीव्हीसमोर बसलेलं पाहून आणि एवढा वेळ झाला तरी मुलगा झोपला नाही हे बघून त्या दोघांना राग अनावर होतो.

पण या चीनी दामप्त्याने त्या मुलाला राग आला म्हणून मारलं नाही, ओरडले देखील नाहीत. त्यांनी फक्त मुलाला टीव्हीसमोर बसवलं आणि फक्त टीव्ही पाहात राहा, पण झोपायचं नाही असं सांगितलं. मुलाला सुरुवातीला टीव्ही पाहणं आवडलं देखील पण जशी जशी त्याला झोप येऊ लागली आणि त्याने झोपण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मात्र, पालकांनी त्याला झोपू दिलं नाही. शिवाय या व्हिडीओमध्ये मुलगा आईला आपल्या खोलीत जाऊन झोपतो असंही सांगताना दिसतं आहे. पण रात्रभर त्याला आई-वडील झोपू देत नाहीत. त्यामुळे जबरदस्ती टीव्ही बघण्याचा मुलाला देखील कंटाळा येतो. शिवाय एक दोन तास नव्हे तर पालकांनी त्याला रात्रभर झोपू दिलं नाही. त्यामुळे या मुलाची टीव्ही पाहण्याची हौस चांगलीच भागली असणार आहे यात शंका नाही.

हेही पाहा- ‘मैं नही तो कौन बे’, आरशात स्वतःला पाहून माकडाने सुरु केलं भांडण अन् पुढं जे झालं…

काहींचा विरोध काहींचे समर्थन –

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या चीनी जोडप्याने मुलाला दिलेल्या शिक्षेचे काही पालकांनी कौतुक केले आहे तर काही पालकांनी ‘मुलाला इतकी कठोर शिक्षा मुलांना द्यायला नको’ असंही म्हटलं आहे. दरम्यान, ‘अशा शिक्षांमुळे यामुळे मुलांना आणखी रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय लागेल’ असंही काहीजण म्हणत आहेत. त्यामुळे या व्हिडीओवर वेगवेगळी मतं नेटकरी व्यक्त करत असले तरी सोशल मीडियावर या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China parents punished his child forced him to watch tv all night jap
First published on: 27-11-2022 at 15:24 IST