scorecardresearch

प्रेमासाठी वाट्टेल ते! लग्न करण्यासाठी मिळणारे ३५ लाख रुपये तरुणीने नाकारले, एंगेजमेंट रिंगही केली परत

प्रियकरावर असणारे कर्ज फेडण्यासाठी तरुणीने स्वत:कडील २१ लाखांहून अधिकची रक्कम मुलाला दिली आहे

प्रेमासाठी वाट्टेल ते! लग्न करण्यासाठी मिळणारे ३५ लाख रुपये तरुणीने नाकारले, एंगेजमेंट रिंगही केली परत
एका तरुणीने प्रेमासाठी ३५ लाख रुपये नाकारले आहेत (Photo : Freepik)

खऱ्या प्रेमासमोर पैसा आणि संपत्तीला काही किमंत नसते असं म्हणतात. याच गोष्टीचा प्रत्येय एका तरुणीच्या कृतीमधून आला आहे. कारण या तरुणीने प्रेमासाठी ३५ लाख रुपये नाकारले आहेत. एवढेच नव्हे तर आपल्या प्रियकरावर असणारे कर्ज फेडण्यासाठी तरुणीने स्वत:कडील २१ लाखांहून अधिकची रक्कम मुलाला दिली आहे. या प्रेम प्रकरणाची आणि मुलीने ३५ लाखांवर पाणी सोडल्याच्या घटनेची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.

हेही पाहा- भावंडांनी हौसेने नवरीला उचललं पण पडण्याच्या भीतीने तिने असं काही केलं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

हे प्रकरण चीनमधील असून झोऊ आडनाव असलेल्या या मुलीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी झोऊने आपल्या होणाऱ्या पतीला २६ हजार डॉलर म्हणजे जवळपास २१ लाख ५१ हजार रुपये दिले आहेत. शिवाय लग्नात मुलाकडून मिळणारा ३५ लाख रुपयांचा हुंडाही नाकारला आहे.

हेही वाचा- विद्यार्थिनीने शिक्षकासोबत पळून जाऊन केलं लग्न; घरच्यांना दिली सुप्रिम कोर्टाची धमकी

चीनमध्ये लैंगिक असमतोलामुळे मुले मुलींना हुंडा देतात. याच पार्श्वभूमीवर झोऊला होऊच्या कुटुंबाकडून 35 लाख रुपये मिळणार होते, मात्र झोऊने प्रेमाचे कारण देत ते घेण्यास नकार दिला. तिने मुलाकडून हुंडा घेण्यास नकार दिलाच शिवाय त्याच्याकडून मिळणारी एंगेजमेंट रिंगदेखील परत केली आहे.

हेही पाहा- ढाब्यावर विश्रांती घेणाऱ्या लोकांवर काळाने घातला घाला, थरारक Video पाहून अंगावर येईल काटा

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्यया वृत्तानुसार, झोऊने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ‘माझी सर्व बचत होऊकडे सोपवली असून कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याला २१ लाखांपेक्षा जास्त रक्कम दिली आहे. पैसा हा प्रेमाचा आधार नाही. माझा होणारा नवरा मला भरपूर प्रेम देईल. शिवाय आम्ही आमच्या चांगल्या भविष्यासाठी एकत्र काम करू.’ असं झोऊ म्हणाली आहे. झोऊ आणि होऊ हे एका ब्लाइंड डेटवर भेटले होते. त्यानंतर अनेक दिवसांच्या ओळखीनंतर ते आता एकमेकांशी लग्न करणार आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 20:03 IST

संबंधित बातम्या