नवरा-बायकोची भांडणं तशी नेहमीचीच. त्यातून काही पुरूष तर आपली बायको एक नंबरची भांडकुदळ असल्याच्या वगैरे तक्रारी वरचेवर आपल्या मित्रांकडे करत असतातच. पण जीवनाच्या या प्रवासात एकमेकांना सांभाळून या दोघांचा सुखदु:खाचा प्रवास छान सुरू असतो. पण, बीजिंगमध्ये राहणारे वेई जिआनगुओ हे थोडे वेगळे आहेत. आपल्या बायकोचा भांडकुदळ स्वभाव त्यांना अजिबात पटला नाही, त्यातून बायकोचा सारखा जाच होऊ लागल्यावर वेई यांनी आपलं बस्तान घरातून थेट बीजिंगच्या विमानतळावर हलवलं.
अरेरे! ३८ लाख खर्च करून आणलेला ‘ख्रिसमस ट्री’ फक्त दोन आठवडे जगला
गेल्या ९ वर्षांपासून ते बीजिंग विमानतळावर राहत आहेत. २००८ मध्ये आपल्या बायकोसोबत कडाक्याचं भांडण झाल्यानंतर त्यांनी आपलं घर कायमचं सोडलं. विमानतळावरचा एक चांगला कोपरा निवडून तिथेच आपलं बस्तान मांडलं. ‘पिअर व्हिडिओ’नं त्यांच्यावर एक व्हिडिओही तयार केला आहे. विमातळावरचा हा छोटासा कोपरा आता आपलं घर झालं असल्याचं ते सांगतात. इथे विजेवर चालणारी छोटीशी शेगडीही त्यांनी घेतली आहे. त्यामुळे तिथेच ते स्वयंपाक करतात आणि झोपतातही. त्यांना दरवर्षी सरकारकडून ठराविक रक्कमेचं अनुदान मिळतं. त्यात त्यांचा खर्च आरामात भागतो.
भगवद्गीता स्पर्धेत मुस्लिम विद्यार्थ्यानं मारली बाजी
बीजिंगच्या विमानतळावर राहायला आल्यापासून क्वचितच वेईनं ही जागा सोडली असेल. जेव्हा काही आवश्यक वस्तू आणायच्या असतील तर ते विमानतळावरून बाहेर पडतात. ‘पिअर व्हिडिओ’च्या माहितीनुसार विमातळावरील कर्मचाऱ्यांनी अनेकदा त्यांना तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, पण गेल्या नऊ वर्षांत वेई यांना हुसकावून लावण्यात त्यांना काही यश आलं नाही. विमानतळावरचा सुरक्षा बंदोबस्त कडक असला की वेई तात्पुरतं आपलं बस्तान दुसरीकडे हलवतात. पण दोन -चार दिवस झाले की पुन्हा ते विमानतळावर येतात. त्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांना देखील विमानतळावरील या नावडत्या पाहुण्याची सवय झाली आहे.