एका चिनी महिलेने (Chinese woman) आपल्या बॉयफ्रेंडबरोबर नातं मजबूत करण्यासाठी सर्व मर्यादां ओलांडल्याची घटना घडली आहे. या महिलेला तिच्या नात्यातील सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी असे काही केले ज्याचा कल्पनेतही कोणी विचार करणार नाही. आपल्या बॉयफ्रेंड काळी जादू करण्यासाठी आपल्या ऑफिसमध्ये ५,५४,२१,५८९.५०($ ६७७,०००) चोरलेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
द साउथ चाइना मॉर्निंग पोस्ट नुसार, “उत्तर पूर्वी चीनच्या लिओनिंग प्रांतमधील वांग नावाच्या अकांउटंट असलेल्या महिलेने आपल्या बॉसच्या पैशांचा दूरपयोग केल्याचे उघडकीस आल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे.
“तिला कोणती शिक्षा होईल याबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही. स्टार व्हिडीओच्या एका अहवालानुसार, ती असे मानते की, ”तिने जे काही केले त्यामुळे फायदा झाला. या महिलेचा बॉस, ज्यांचे आडनाव Qiao आहे, त्याने जेव्हा पोलिसांना कॉल केला होता, तेव्हा गेल्या ऑगस्टपर्यंत कंपनीच्या खात्यांमध्ये काहीही चुकीचे आढळले नाही,”
हेही वाचा – तलावात न पोहता तरंगतोय ‘हा’ तरुण, ही जादू नव्हे, विज्ञान आहे! वाचा काय आहे प्रकरण
या प्रकरणाची तपासणी करतेवेळी, पोलिसांनी चोरीचे पैशांनी खरेदी केलेल्या डिझायनर बॅग आणि कपडे जप्त केले
SCMP एससीएमपीने पुढे सांगितले की, वांगने मार्च २०१८ मध्ये कंपनीचे पैसे फिरवण्यास सुरुवात केली, त्याच वेळी त्याचा बॉयफ्रेंडला गमावणार होती. आणि त्याला आपल्या नात्यामध्ये टिकवून ठेवण्याची तिची इच्छा होती.
ती आपल्या अडचणी असलेली लव्ह लाइफ सुधारण्यासाठी अधीर झाली होती. वांग हिला ऑनलाइन भविष्य सांगणाऱ्या आणि राशिभविष्य सांगणाऱ्या जाहिरातींनी भुरळ घातली आणि त्यांनी तिला विश्वास दिला की ती तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धार्मिक संस्कारांवर विश्वास ठेवू शकते.
”काळ्या जादूने तिला चांगले नशीब मिळवून दिले आणि ऑफिसमधील पैसे चुकीच्या पद्धतीने खर्च केल्याबद्दल अटक झाल्यानंतरही तिचे नाते टिकवून ठेवले, असा वांगचा ठाम विश्वास होता.