आपला फोन काहीजणांना प्राणापेक्षाही प्रिय असतो. एकवेळ इतर वस्तू हरवल्या तरी त्याचं एवढं दु:ख त्यांना वाटणार नाही पण फोन बंद पडला किंवा त्यात काही बिघाड झाले की त्यांचा जीव अगदी टांगणीला लागतो. काहींना तर मोबाईलचं इतकं वेड असतं की जिथे जातील तिथे त्यांना फोन सोबत लागतोच. शौचालयाला जाताना किंवा झोपतानादेखील ते फोन स्वत:पासून लांब ठेवत नाही. पण यापलीकडेही फोनचं भयंकर वेड असणारी माणसं या जगात आहेत, जी फोनसाठी जीवही धोक्यात घालायला मागेपुढे पाहणार नाही. आता या शेवटच्या वाक्यावर तुमचाही विश्वास बसत नाहीय ना? मग हा व्हायरल होणारा व्हिडिओ पाहा.

रशियन जोडप्याचं फोटोशूट पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल

एका महिलेचा फोन फोटो काढताना चुकून तलावात पडला तेव्हा ती महिला पोहता येत नसतानाही पाण्यात उडी मारायला निघाली होती. तिचा हा खुळचटपणा पाहून लोकांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला पण ती काही ऐकेना, शेवटी प्रवासी आणि कॅप्टनने तिला कसंबसं थांबवलं. या महिलेचं नाव समजू शकलं नाही मात्र ती क्रूझनं प्रवास करत होती तलावाचं मनोहारी दृश्य कॅमेरात टिपण्यासाठी तिने फोन बाहेर काढला, पण फोटो काढताना तो चुकून पाण्यात पडला, त्यामुळे तो मिळवण्यासाठी ती चक्क पाण्यात उडी मारायला निघाली होती.  आता फोनचं इतकं वेडं लागलेली महिला यापूर्वी कोणी कधीही पाहिली नव्हती त्यामुळे या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Video : विश्वविक्रमासाठी कायपण! त्याने तोंडात पेटत्या मेणबत्त्या ठेवल्या