पुण्यात होणारी वाहतूक कोंडीची समस्या ही आता नेहमीची झाली आहे. त्यात चांदणी चौक हा पुणेकरांसाठी अत्यंत त्रासदायक ठरक आहे. चांदणी चौक म्हणजे पुणेकरांसाठी भुलभुलैयाच झाला आहे कारण याठिकाणी आठ रस्ते एकत्र येतात पण कोणता रस्ता नक्की कुठे जातो हे मात्र कोणालाच समजत नाही. सध्या चांदणी चौकातल्या परिस्थितीला पुणेकर किती वैतागले आहेत हे दर्शविणारा एक मजेशीर व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. व्हिडीओ पाहून पुणेकरांना प्रश्न पडला आहे की, चांदणी चौकातून गाडी कशी बाहेर काढायची याचे क्लासेस घ्यावे लागणार का? काय आहे हा व्हिडीओ जाणून घेऊ या सविस्तर….

चांदणी चौक आणि वाहतूक कोंडी हे समीकरणच झालं आहे. चांदणी चौकात आले की कोणत्या रस्त्याने जावे हा प्रश्न पडत असतो याचे उत्तर देणारा एक मजेशीर व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण चांदणी चौकात एक फलक घेऊन उभा असलेला दिसत आहे. तरुणाच्या हातातील फलक वाचण्यासाठी लोक आवर्जून थांबत आहे आणि हसत हसत पुढे जाताना दिसत आहे. तरुणाच्या हातातील फलकावर लिहिले आहे की, ”आमच्या इथे चांदणी चौकाच्या कुठल्या रस्त्यावरून कुठे आणि कसे जायचे याचे क्लासेस घेतले जातील.”

हेही वाचा – बाळाला असं कोण शांत करतं? बाळाचे रडणे थांबवण्यासाठी आईने चक्क दुधाच्या बाटलीत ओतली दारू अन्…

हा व्हायरल व्हिडीओ पवन वाघुळकर या सोशल मिडिया इन्फ्ल्यूएन्सरच्या अकाऊंटवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना, ”पुणे तिथे काय उणे” असे कॅप्शन दिले आहे. असे कोणतेही क्लासेस सुरू झालेले नसून हा एक उपाहासात्मक व्हिडीओ असून प्रशासनाला लगावलेला मजेशीर टोला आहे. पुणेकरांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला असून आतापर्यंत १२७,१३२ लोकांना पसंती दर्शवली आहे. व्हिडीओवर लोकांनी अतिशय मजेशीर प्रतिक्रिया दर्शविल्या आहेत. काहीं चांदणी चौकातील त्यांचे त्रासदायक अनुभव सांगितले तर काहींनी मजेशीर टोले लगावले.

हेही वाचा – पेमेंटसाठी रिक्षा चालकाने चक्क स्मार्ट वॉचमध्ये दाखवला QR code; ग्राहक झाला चकित, व्हायरल झाला फोटो

एकाने म्हटले, ”जगात भारी पुणेरी पाट्या. शिवाय क्लासेसला १ ते ४ दुपारी सुट्टी असेल.” तर दुसऱ्याने म्हटले, ”चांदणी चौकातून गाडी बाहेर काढायचे ७०० रुपये घेतले जातील”

तिसऱ्याने म्हटले, ”हे भारी आहे. लोकांना गरज आहे’ तर, चौथ्याने विचारले, ”फि किती आहे?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला?