आपल्या पाळीव श्वानानं चप्पलांचा चावा घेतला म्हणून रागानं लालबूंद झालेल्या मालकानं वर्षभरापूर्वी आपल्या पाळीव श्वानाचे पाय तलवारीनं कापून टाकले होते. या अमानुष कृत्याची चर्चा सगळीकडे झाली होती. जगभरातील प्राणिप्रेमींनी या माणसाच्या अमानवी कृत्याविरोधात आवाज उठवला. बँकॉकमध्ये ही घटना घडली होती. त्यानंतर ‘कोला’ नावाचा हा पाळीव श्वान कधीही चालू शकला नाही. त्याला कायमचं अपंगत्त्व आलं.
Video : एका लग्नाची दुर्मीळ गोष्ट, जुळ्या भावांनी केला जुळ्या बहिणींशी विवाह
गेम खेळून झाला जगातील ‘श्रीमंत यूट्युबर’, वार्षिक कमाई ८० कोटी
या घटनेनंतर श्वानाच्या मदतीसाठी थायलँडमधली ‘सोई डॉग’ ही प्राणीप्रेमी संस्था पुढे आली. आणि या निरपराध मुक्या प्राण्याला मदत केली. या प्राण्याला आपण त्याचे पाय तर परत मिळवून देऊ शकत नाही. पण, किमान त्याला असंच मरू द्यायचं नाही ही या संस्थेच्या संस्थापक जॉन डेली यांची धडपड होती. म्हणूनच त्यांनी या श्वानासाठी ‘ब्लेड रनर’ या कृत्रिम पायांचा पर्याय शोधला. गेल्याकाही महिन्यांपासून जॉन डेली हे ब्लेड रनरच्या साह्यानं या कोलाला चालायला शिकवत आहेत. कोलासाठी त्यांनी खास ‘सी’ आकारात वळलेले कृत्रिम पाय तयार करून घेतले. ‘सोई डॉग’ या संस्थेमुळे अपंगत्त्व आलेला कोला चांगला चालू फिरू लागला. आता कोला या पायांच्या मदतीनं धावूही शकतो.