आपलं सगळं जीवनच व्हर्चुअल झालंय. आपण व्हिडिओ कॉल्सवर बोलतो, व्हॉट्सअॅपवर चॅट करतो, नेटवर गेम्स खेळतो, अगदी डेटिंगसुध्दा करतो. दररोजच्या धावत्या जीवनात वेळ नाही म्हणून अनेक गोष्टी आपण व्हर्च्युअली करतो. या सगळ्या धबडग्यातून बाहेर निघून शांतपणे एका ट्रिपला जावं असं बऱ्याचदा मनात येतं. पण त्यासाठीही आपल्याकडे वेळ नसतो. मग आता तुमच्यासाठी ‘व्हर्च्युअल ट्रिप’ची संकल्पना फेसबुकने काढली आहे. फेसबुकच्या वार्षिक ‘डेव्हलपर्स कॉन्फरन्स’मध्ये या कल्पनेचं सूतोवाच झालं.

आपल्याकडे सध्या जवळपास सगळ्यांकडे स्मार्टफोन असले तरी ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी’ हा प्रकार आपल्याकडे तितकासा रूजला नाहीये. खालचा फोटो बघा.

virtual trip, virtual vacation, facebook, facebook developers conference, marathi news, marathi, Marathi news paper, Marathi news online, Marathi Samachar, Marathi latest news,news, entertainment marathi news, Bollywood news, Sports news in marathi, Health news, political news in marathi,breaking news,marathi batmya
आॅक्युलस

या ‘डिव्हाईस’ला ‘ऑक्युलस’ असं म्हणतात. व्हर्च्युअल रिअॅलिटी अनुभवण्यासाठी या डिव्हाईसचा वापर केला जातो. आतापर्यंत मुख्यत: गेमिंग आणि सिनेमा बघण्यासाठी ऑक्युलसचा वापर केला जातो. याचा वापर केला तर आपण प्रत्यक्ष त्या गेममध्ये आहोत असं आपल्याला वाटतं. हा काही गाॅगल नाही. वरच्या फोटोमधला माणूस सिनेमा बघतोय पण तो त्याच्या ‘डोळ्यांसमोर’ सुरू आहे. अशाच डिव्हायसेसचा वापर करून आता ‘व्हर्च्युअल व्हेकेशन’ ची कल्पना पुढे आली आहे. अशा ‘व्हर्च्युअल व्हेकेशनमध्ये’ आपल्याला आपल्या मित्रमैत्रिणींसोबतही व्हर्च्युअली जाता येईल. त्यासाठी आपल्याला आपला एक ‘ऑनलाईन अवतार’ बनवावा लागेल. आणि आपल्या दोस्तांच्या अशाच ऑनलाईन अवतारांसोबत ‘चिल’ करता येईल. कामात अतिशय मग्न असणाऱ्या हाय परफॉर्मिंग प्रोफेशनल्सना हा पर्याय आवडेल की नाही याविषयी फेसबुकच्या या कॉन्फरन्समध्ये चर्चा झाली.

पण मुख्य प्रश्न असा आहे राव, की आपल्या डोळ्यांसमोर तर आपल्या व्हेकेशनची ती जागा दिसेल हे तर खरं आहे. पण तिथलं हवामान आपण जिथे आहोत तिथे कसं आणणार? म्हणजे आपण ‘व्हर्च्युअली’ भले हिमालयात जाऊ, पण इथल्या उन्हाळ्याच्या झळा लागणारच ना? त्यामुळेच की काय ही कल्पना तडकाफडकी प्रत्यक्षात न उतरवायचा निर्णय घेतला गेलाय. संशोधन सुरू आहे.