कर्नाटकमधील एका काँग्रेस आमदाराने दलित समाजातील संताला स्वतःच्या तोंडातील घास काढून त्यांना भरवण्यास सांगितला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जमीर अहमद खान असं या काँग्रेस आमदाराचं नाव आहे. जमीर खान यांनी समाजातील धर्माधर्मात द्वेष निर्माण करणाऱ्या कट्टरतवाद्यांना उत्तर देण्यासाठी दलित संताच्या तोंडातील घास खाल्ला. या कृतीतून त्यांनी जातीभेद, धर्मभेद मानत नसल्याचा संदेश दिला. ते चामरपेटमध्ये आयोजित आंबेडकर जयंती-ईद मिलनच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आले होते.

रविवारी झालेल्या या कार्यक्रमात जमीर खान यांनी समाजात निर्माण होत असलेल्या विभाजनावर भाष्य केलं. तसेच दोन समाजात निर्माण होत असलेली दरी कमी करण्यावर भर दिला.

बेंगळुरूमधील चामरपेट मतदारसंघाचे आमदार जमीर खान यांनी समाजासमाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांवर सडकून टीका केली. तसेच माणसा माणसात कोणताही भेद नसल्याचं सांगत दलित समाजाचे संत नारायण यांना घास भरवला. यानंतर संत नारायण त्यांना ताटातून वेगळा घास भरवण्यास गेले, तर त्यांनी वेगळा घास नको म्हणत त्यांच्या तोंडातील घासाचा काही भाग काढून भरवण्यास सांगितलं.

आमदार जमीर खान यांनी आग्रह केल्यानंतर स्वामी नारायण यांनी देखील त्यांच्या तोंडातील घासाचा काही भाग का़ढून खान यांना भरवला. यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडात करत त्यांचं कौतुक केलं.

हेही वाचा : “लिंबू १० रुपयाला दोन, घेतंय का कोण? की लावू शरद पवारांना फोन”, सोलापूरच्या शेतकऱ्याचा Video व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जमीर खान आतापर्यंत चारवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री, ग्राहक संरक्षण आणि अल्पसंख्याक मंत्री म्हणूनही काम केलं आहे.