Congress Leaders Fight Video: लाइटहाऊस जर्नालिज्मला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला एक व्हिडीओ दिसून आला. या व्हिडिओमध्ये लोक एकमेकांना मारहाण करताना दिसत होते. पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, व्हिडिओमध्ये हरियाणातील सिरसा येथे भाजपा नेत्याला मारहाण होत आहे. तपासादरम्यान आम्हाला सिरसा येथील या व्हिडीओचा काँग्रेसशी संबंध असल्याचे आढळून आले.

काय आहे दावा?

X यूजर Shakti Kumar Mehta ने व्हिडिओ व्हायरल दाव्यासह शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून आमचा तपास सुरू केला आणि व्हिडीओमध्ये मिळवलेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्चचा वापर करून व्हिडीओ शोधण्यास सुरुवात केली. एका रिव्हर्स इमेज सर्चने आम्हाला पंजाब केसरी हरियाणाच्या अधिकृत YouTube हँडलवर व्हिडीओ सापडला.

हा व्हिडीओ व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ सारखाच होता.

डिस्क्रिपशनमध्ये नमूद करण्यात आले आहे की, हा व्हिडीओ काँग्रेस नेते निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांशी भांडले होते, तेव्हाचा आहे.

आम्हाला तोच व्हिडीओ Ambala Breaking Newsच्या फेसबुक पेजवर अपलोड केलेला आढळला.

या कॅप्शनमध्ये भांडणातून ओळखल्या गेलेल्या दोन गटांची नावे देखील दिली आहेत. आम्हाला एक कीफ्रेम देखील सापडली, जिथे आम्हाला एक दुकान दिसले, ‘शर्मा मिष्टान भंडार’, नावाचे हे दुकान सैमाण गाव, सिरसा येथील असून ते गूगल मॅपवर सुद्धा आढळून आले.

https://www.google.com/maps/@29.6194574,75.9362756,3a,19.9y,111.94h,94.7t/data=!3m6!1e1!3m4!1sRybzbKzMiCNPWHNJPF5EyA!2e0!7i13312!8i6656?entry=ttu

त्या दुकानदाराला कॉल केला असता, मालकांनी या व्हिडीओमध्ये दिसणारे लोक कोण आहेत हे माहित नसलं तरी ही हाणामारी तिथेच झाल्याची पुष्टी केली. त्यानंतर आम्ही ‘अंबाला ब्रेकिंग न्यूज’च्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला ज्यांनी त्यांच्या पेजवर व्हिडीओ पोस्ट केला होता. टीममधील राहुलने पुष्टी केली की हा व्हिडीओ सिरसा गावातील आहे. व्हिडीओमध्ये भांडताना दिसणारे लोक काँग्रेसच्या दोन गटातील आहेत, एक काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा व दीपेंद्र हुडा, यांच्या गटातील हे लोक आहेत.

हे ही वाचा<< “मुस्लिमांचा खरा मित्र काँग्रेसला आपण..”, मतदानासाठी पैसे देत आवाहन करणारे पत्र व्हायरल; कॉल करताच समजलं सत्य..

निष्कर्ष: सिरसा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडीओ खोट्या दाव्यासह व्हायरल झाला आहे. व्हायरल दाव्यामध्ये भाजपा नेत्याला मारहाण करण्यात आल्याचा दावा खोटा आहे.