Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कधी कॅमेरात अशा घटना कैद होतात की आपल्याला विश्वास बसत नाही. विशेषत: लोकल किंवा मेट्रोमधील प्रकरणे चांगलेच व्हायरल होताना दिसतात. मागील काही महिन्यांपासून मेट्रोतील आणि मेट्रो स्टेशनवरील अनेक प्रकरणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कधी कोणी मेट्रोमध्ये विचित्र प्रकारचा डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. कधी लोकं वाद घालताना दिसतात तर कधी कपल रोमान्स करताना दिसतात.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मेट्रो स्टेशनवर एक कपल रोमान्स करताना दिसले. हा व्हिडीओ पाहून कोणालाही धक्का बसेल. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. भर मेट्रो स्टेशनवर हे कपल एकमेकांना किस करताना दिसत आहे.

cow cuddling Seller Then Vendore feeding the some vegetables To Her Video Winning Hearts Online
VIDEO: गाय पक्की शिस्तीची! भाजीवाल्याकडे खाणं मागायला गेली अन् असं काही केलं की, तुम्हीही कराल कौतुक…
a woman stole from a another woman purse now the video is going viral on social media
“काकी तर एकदम प्रोफेशनल चोर निघाल्या’; दुकानात आल्या अन् क्षणात पर्स चोरी करुन निघाल्या; पाहा Video
a drunkard was in jail started singing painful song
तुरुंगात कैद असलेल्या मद्यपीने गायलं सॅड गाणं, पोलिसांना हसू आवरेना; व्हिडीओ होतोय व्हायरल
devendra fadnavis and manoj jarange patil (1)
मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट, “देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला आणि..”

व्हायरल होतोय व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ मेट्रो स्टेशनवरील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक कपल भर मेट्रो स्टेशनवर रोमान्स करताना दिसत आहे. कपल एकमेकांना किस करताना दिसले. त्यांच्या आजुबाजूला अनेक लोकं ये-जा करताना दिसत आहे पण त्यांना फरक पडत नाही. ते रोमान्स करण्यात मग्न आहे. या कपलचा हा रोमान्स मात्र कॅमेरात कैद झाला आहे. त्यांचा हा व्हिडीओ मेट्रोतील एक प्रवाशाने बनवला आहे. व्हिडीओतील आवाजावरून लक्षात येईल की हा व्हिडीओ नोएडाच्या १६ मेट्रो स्टेशनवरील आहे.सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यापूर्वी सुद्धा मेट्रोमध्ये रोमान्स करणाऱ्या कपल्सचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.

हेही वाचा : भररस्त्यात लावण्यात आले असे साइनबोर्ड, की वाचून गोंधळात पडले लोक; म्हणाले, “वैतागलेले ड्रायव्हर्स…”

Lailaa या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दिल्ली मेट्रोमध्ये आपले स्वागत आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून दु:ख वाटले.” तर एका युजरने लिहिलेय, “दिल्लीमध्ये लोकांना हवा प्रदूषणाचा नाही तर याचा जास्त त्रास होतोय.”