सध्या सोशल मीडियावर एका जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये संबंधित जोडपं धावत्या दुचाकीवर रोमान्स करताना दिसत आहे. रहदारी असलेल्या रस्त्यावर हे जोडपं सिनेस्टाइल रोमान्स करत आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, हा व्हिडीओ लखनऊमधील एका ठिकाणचा आहे. मात्र, लखनऊमधील नेमक्या कोणत्या ठिकाणचा हा व्हिडीओ आहे, याची पुष्टी करण्यात आली नाही. पण या व्हिडीओमध्ये प्रेमीयुगुल धावत्या स्कूटीवर रोमान्स करताना दिसत आहे. ज्यामध्ये तरुण दुचाकी चालवत आहे. तर तरुणी सिनेस्टाइल पद्धतीने तरुणाला मिठ्ठी मारून बसली आहे.

हेही वाचा- मालकिणीला घरकामात मदत करताना वानराची दमछाक, Viral Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

तरुणीने आपल्या प्रियकराला घट्ट पकडलं असून ती त्याला वारंवार किस करताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी स्कूटीचा वेगही चांगला होता. शिवाय रस्त्यावर आजुबाजूला लोकांची गर्दी होती. रस्त्यावर गर्दी असताना दोघंही धावत्या दुचाकीवर रोमान्स करत आहेत. याबाबतचं वृत्त ‘झी न्यूज’ने दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

VIDEO: लखनऊमध्ये जोडप्याचा धावत्या दुचाकीवर रोमान्स

हा प्रकार सुरू असताना पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. संबंधित व्हायरल व्हिडीओची पुष्टी ‘लोकसत्ता’ करत नाही.