scorecardresearch

Premium

VIDEO : हे काय नवीन! चेहऱ्यावर साकारलाय विचित्र मेकअप, व्हिडीओ पाहून डोकं धराल

सोशल मीडियावर सुंदर सुंदर मेकअप करतानाचे व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये १० मेकअप स्टाइल दाखवल्या आहेत. चेहऱ्यावर दहा विचित्र प्रकारचे मेकअप काढलेले आहेत. हे मेकअप पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Crazy makeup art
हे काय नवीन! चेहऱ्यावर साकारलाय विचित्र मेकअप, व्हिडीओ पाहून डोकं धराल

Viral Video : मेकअप हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सोशल मीडियावर मेकअपविषयी अनेक टिप्स आणि ट्रिक्स सांगणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. खर तर मेकअप ही कला आहे. प्रत्येक जण त्यांच्या आवडीनुसार मेकअप करतो. सोशल मीडियावर सुंदर सुंदर मेकअप करतानाचे व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये १० मेकअप स्टाइल दाखवल्या आहेत. चेहऱ्यावर दहा विचित्र प्रकारचे मेकअप काढलेले आहेत. हे मेकअप पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

असं म्हणतात, कला ही कला असते. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला जाणवेल की कोणत्याही कलेला तोड नसते. या व्हायरल व्हिडीओमध्ये चेहऱ्यावरील मेकअप दाखवले आहे पण हे मेकअप इतक्या विचित्र आणि विभिन्न प्रकारचे आहेत की पाहून कोणीही सुन्न होईल. चेहऱ्यावर विचित्र डिझाइन्स काढलेल्या व्हिडीओत दिसत आहे. या डिझाइन्स इतक्या सुंदर साकारल्या आहेत की खरंच हा चेहरा आहे आहे का की एखादी कलाकृती हे लगेच समजत नाही.या व्हिडीओत दहा चेहरे दाखवले आहे. या दहा चेहऱ्यांवर वेगवेगळ्या कलाकृती साकारल्या आहेत. ही मेकअप कला पाहून कोणीही थक्क होईल.

pet dog save child from falling down the stairs
… म्हणून कुत्रा माणसाचा चांगला मित्र आहे, कुत्र्याने चिमुकलीला पायऱ्यांवरून पडताना वाचवले; पाहा VIDEO
kids dance video
“…इत्ता सा टुकडा चाँद का”; चिमुकलीच्या चेहऱ्यावरील हावभाव अन् डान्स स्टेप्स पाहाच, डान्स व्हिडीओ व्हायरल
model wearing caged rat high heel on street
फॅशन म्हणून चक्क पायात घातला उंदराचा पिंजरा! पाहा हा Video पाहून तुम्ही चक्रावून जाल
parents were scared by seeing a child head is seen stuck in the railing of the staircase
बापरे! क्षणभरासाठी आई वडील घाबरले, खोडकर चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून डोकं धराल

हेही वाचा : Optical Illusion : लपलेले ‘E’ अक्षर शोधून दाखवा, अर्धा तास घ्या तरीसुद्धा शोधू शकणार नाही…

artistworldly या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “विचित्र मेकअप कला” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप विचित्र आहे” तर एका युजरने लिहिलेय, “खरंच कलाकार खूप क्रिएटिव्ह आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे खूप अप्रतिम आहे.. माझ्याकडे शब्द नाही.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर या विचित्र मेकअप कलेचे कौतुक केले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Crazy makeup art on face video goes viral on instagram ndj

First published on: 08-12-2023 at 11:06 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×