scorecardresearch

Video: धवला गीतातून सामन्याचं समालोचन, टेनिस क्रिकेट स्पर्धेतील व्हिडीओ व्हायरल

धवलारीन क्रिकेट सामन्यांचं धवला गीतातील शैलीत समालोचन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच भावला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

Dhawlarin
Video: धवला गीतातून सामन्याचं समालोचन, टेनिस क्रिकेट स्पर्धेतील व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ कधी हसायला, तर कधी विचार करायला भाग पाडतात. काही जण एका रात्रीत स्टार होऊन जातात. त्यामुळे सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. आता असाच एक टेनिस क्रिकेट स्पर्धेतील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. धवला गीत आगरी कोळी लग्नात गायली जातात. धवला गीतं गाणाऱ्यांना धवलारीन म्हणतात. एका विशिष्ट चालीत धवला गीतं म्हणणाची प्रथा आहे. मात्र आता हीच धवलारीन क्रिकेट सामन्यांचं धवला गीतातील शैलीत समालोचन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच भावला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओत धवलारीन आजी स्पर्धेदरम्यान धवला गीतातून समालोचन करताना दिसत आहे. या स्पर्धेत रायगड आणि ठाणे यांच्यात सामना सुरु आहे. तेव्हा धवला गीतातून सामन्याचं चित्र उभं करत आहे. या व्हिडीओला नेटकरी पसंती देत आहेत.

हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cricket commentary video from dhawala geeta goes viral rmt

ताज्या बातम्या