भारतीय लोक क्रिकेटवर खूप प्रेम करतात. भारतीय लोकांसाठी क्रिकेट हा खेळ नसून भावना आहे. वर्ल्ड कप इथे एखाद्या सणासारखा साजरा केला जातो. तुम्ही भारतातील कोणत्याही रस्त्यावर किंवा गल्लीबोळ्यात गेलात तर तुम्हाला नक्कीच कोणी ना कोणी लहान मूलं क्रिकेट खेळताना दिसतील. विशेष म्हणजे रविवार हा तर जवळपास अनेक भारतीय तरुणांसाठी क्रिकेटचा दिवस असतो. पण आता तुम्ही विचार करत असाल की, या सर्व गोष्टी सांगण्यामागचे कारण काय? तर कारणंही तसेच आहे, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. ज्यात एका व्यक्तीने क्रिकेटची आवड जोपासण्यासाठी असे काही केले की जे पाहून तुम्ही अवाक व्हाल.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका इमारतीच्या छतावर बांबू, ड्रिल मशीन आणि क्रिकेट नेट ठेवली आहे. यानंतर ती व्यक्ती बांबूला ड्रिल मशीनने छिद्र पाडून ते बांबू गच्छीच्या काठावर उभे करुन फिट करताना दिसत आहे. छताच्या सर्व कोपऱ्यांमध्ये बांबू फिट करुन झाल्यानंतर तो व्यक्ती बांबूवर नेट फिट करतो. काही वेळातच ती व्यक्ती इमारतीच्या छताचे क्रिकेटच्या भल्यामोठ्या मैदानात रुपांतर करतो. यानंतर तिथे लाईट्स लावतो आणि सामना खेळताना दिसतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket lover such a passion for sports that a man converted his building rooftop into a cricket ground people are liking the video sjr
First published on: 01-03-2024 at 18:43 IST