पाश्चिमात्य देशातील लोकांना कायम हिंदू धर्माबद्दल आपुलकी राहिली आहे. हिंदू धर्मातील चालीरिती आणि प्रथा याबाबत कुतुहूल असतं. मग तो कुंभमेळा असो की इतर धार्मिक उत्सव. परदेशी पर्यटक कायम अशी दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करताना आपल्याला दिसत असतात. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टीव्ह वॉ यालाही हिंदू धर्माबद्दल आपुलकी राहिली आहे. क्रिकेटमधून १३ वर्षांपूर्वी निवृत्ती घेतली असली तरी स्टीव्ह वॉ सतत भारतात ये-जा करत असतो. २००९ मध्ये स्थापन केलेल्या स्टीव्ह वॉ फाउंडेशनच्या माध्यमातून विविध धार्मिक कार्यक्रमात सहभाग असतो. मात्र यावेळी स्टीव्ह वॉ यांची भारत भेट वेगळ्या कारणासाठी होती. आपल्या जवळच्या मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी वाराणसी गाठलं. मृत्यूनंतर त्याच्या अस्थिंचं विसर्जन गंगा नदीत केलं.

“माझ्या हातून पुण्यकर्म घडावं अशी इच्छा होती आणि त्याचबरोबर वाराणसीला भेट द्यायची होती. यात खूप आध्यात्मिक भावना आहे. ब्रायनच्या अस्थि विसर्जन करण्याचं पुण्यकर्म माझ्याकडून घडलं. याचा मला मनापासून समाधान वाटत आहे. त्याचे जीवन खूप खडतर होते आणि त्याला कुटुंब नव्हते. गंगेत अस्थिविसर्जन करावं ही त्यांची शेवटची इच्छा होती. त्याच्यासाठी काहीतरी केल्याबद्दल मला खूप समाधान वाटत आहे.,” असं स्टीव्ह वॉने इंडिया टुडेशी बोलताना सांगितलं.

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टीव्ह वॉ कोलकाता येथील उदयन फाऊंडेशनसोबत कार्यरत आहे. ऑस्ट्रेलियात दुर्मिळ आजार असलेल्या मुलांना मदत करण्यासाठी स्टीव्ह वॉ फाउंडेशन ही संस्था देखील आहे. स्टीव्ह वॉन २००४ मध्ये शेवटची कसोटी खेळली होती. भारताने सिडनी येथे चार सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.