चोरांचा पाठलाग करुन त्यांना अटक करणं आणि गुन्ह्यांच्या तपास करणं हे जगातील कोणत्याही पोलीस खात्याचे मुख्य काम असतं. अर्थात आता चित्रपटांमध्ये दाखवला जाणारा चोरांचा पाठला अगदी रंजक वाटत असला तरी खऱ्या आयुष्यात हे काम अधिक गोंधळात टाकणारे आणि गुंतागुंतीचे असते. त्यातही अनेकदा चोरांचा पाठलाग करताना विचित्र अनुभव पोलिसांना येता. असचा काहीचा प्रकार स्कॉटलण्डमध्ये घडला. येथील वेस्ट बाससेटलॉ पोलीस दोन आरोपांचा शोध घेत होते. मात्र त्यांचा पाठलाग करताना दोघेही लपले. पण त्याचवेळी एका चोराने वायू उत्सर्जन केल्याने (पादल्याने) हे दोघेही पकडले गेले. यासंदर्भात पोलिसांनीच सोशल नेटवर्किंग पोस्टमधून माहिती दिली आहे.

पोलीस या दोन आरोपांना पकडण्यासाठी गेले असता त्यांनी नागरी वस्तीमधून पळ काढला आणि रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या झाडांमध्ये ते लपले. पोलीस पाठलाग करत तेथे पोहचले मात्र आरोपी कुठे फरार झाले यांचा त्यांना काही अंदाज बांधता येत नव्हता. आपल्या हातून पुन्हा एकदा हे दोघे सुटले असं पोलिसांना वाटत असतानाच त्यांना झाडांच्या मागून पादण्याचा आवाज आला आणि चोर पकडले गेले. “चोर आमच्या हातून निसटल्याचे आम्हाला वाटले. मात्र अचानक झाडांमागून तो आवाज आला आणि आम्ही आवाजाच्या दिशेने झाडांमध्ये जात या दोघांना ताब्यात घेतलं,” असं या चोरांचा पाठलाग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. हा सर्व प्रकार काही दिवसांपूर्वी घडला असून पोलिसांनी यासंदर्भात ७ मे रोजी फेसबुक पेजवरुन पोस्टही केली आहे. काय आहे पोलिसांचे म्हणणे तुम्हीच वाचा…

या पोस्टवर अनेकांनी कमेंट करुन पोलिसांचे अभिंदन केलं आहे तर अनेकांनी ब्रिलियंट असं म्हणत पोलिसांच्या या आगळ्यावेगळ्या यशस्वी तपास मोहिमेचे कौतुक केलं आहे.