यंदाच्या आयपीएलच्या १६ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने जेतेपदावर नाव कोरंल. IPL च्या इतिहासात चारवेळा जेतेपद जिंकणाऱ्या चेन्नईने धोनीच्या नेतृत्वात यंदाच्या हंगामातील आयपीएलचा किताब जिंकला. चेन्नईच्या विजयामुळे पुन्हा एकदा धोनीची क्रिकेटप्रेमींमधील क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर धोनीचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत, तो मैदानात खेळायला आला तरी त्याच्यासाठी मोठमोठ्याने ओरडणारे त्याला चीअर करण्यासाठी स्टेडीयममध्ये उभे राहणारे अनेक चाहते तुम्ही पाहिले असतील यात शंका नाही.
पण सध्या धोनीच्या एका अनोख्या चाहत्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. त्याचं कारण म्हणजे या चाहत्याने चक्क त्याच्या लग्नाच्या पत्रिकेवर धोनीचा फोटो आणि CSK जर्सीवरील ७ नंबर छापत त्याने माहीवरील प्रेम व्यक्त केलं आहे. शिवाय या चाहत्याने लग्नपत्रिकेत धोनीचा उल्लेख ‘थाला’ असा केला आहे. धोनीच्या या चाहत्याचे लग्न ७ जून रोजी होणार आहे. CSK चे अनेक चाहते धोनीला प्रेमाने ‘थाला’ म्हणतात.
हेही वाचा- AI च्या मदतीने केली ५ कोटींची फसवणूक; बनावट Video कॉल कसा ओळखायचा? ‘या’ टिप्स लक्षात ठेवाच
शनिवारी @itsshivvv12 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन या लग्नपत्रिकेचा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “CSK #yellove फेवर अजून संपलेला नाही, छत्तीसगडमधील धोनीच्या चाहत्याने धोनीचा चेहरा आणि जर्सी नंबर ७ त्याच्या लग्न पत्रिकेवर छापला आहे, त्याने CSK च्या कॅप्टनला लग्नाचं आमंत्रण दिलं आहे.” ही लग्नपत्रिका शेअर करताच ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय यावर अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
एका नेटकऱ्याने लिहिले की, “वाह हे मस्त आहे”. तर मे मध्ये धोनीच्या अशाच एका चाहत्याने क्रिकेटरला चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमचे एक लघु मॉडेल भेट दिले. @instamsdhoni.fc या फॅन अकाऊंटद्वारे धोनी आणि त्याच्या चाहत्यामधील संवादाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे.