भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची लाडली कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. तिचे वेगवेगळ्या अंदाजातील व्हिडीयो कायमच नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतात. मल्याळममध्ये भक्तीगीत गाणारी झिवा, आपल्या लाडक्या बाबांसाठी मैदानात पाण्याची बाटली घेऊन धावत जाणारी झिवा, कॅप्टन कूलसोबत लाडू फस्त करणारी झिवा, पोळ्या लाटणारी झिवा… असे तिचे नाना तऱ्हेचे अंदाज नेहमीच सगळ्यांना भावतात. तर नुकताच झिवाचा आणखी एक व्हिडीयो चर्चेत आहे. हा व्हिडीयो कॅप्टनकूल धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून यामध्ये ही झिवा आपल्या बोबड्या बोलात चेन्नई सुपरकींग्जच्या खेळाडूंना शुभेच्छा देत आहे. इतकेच नाही गोंडस झिवा या शुभेच्छा देत नंतर फ्लाईंगकीसही देताना दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या पाश्र्वभूमीवर तिचा हा व्हिडीयो भलताच प्रसिद्ध होत आहे. धोनी चेन्नई सुपरकींग्ज संघाचा कर्णधार असून बाबांनाही ती आपल्या व्हिडीयोतून शुभेच्छा देताना दिसत आहे. या व्हिडीयोमध्ये ती CSK CSK असे ओरडत आहे. याबरोबरच बाबांना म्हणजेच कॅप्टनकूलला ती कमॉन पापा असे म्हणत चिअरअप करत असल्याचेही दिसत आहे. पांढऱ्या फ्रॉकमधली चिमुकली झिवा सगळ्यांच्याच मनाचा ठाव घेत असल्याचे दिसत आहे. धोनीच्या इन्स्टाग्रामच्या या पोस्टला ७ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून असंख्य कमेंटसही आल्या आहेत. याशिवाय याच पोस्टमध्ये धोनीने झिवाचा नाचतानाचा आणखी एक व्हिडीयो शेअर केला आहे. त्यात त्याने किमान ही माझ्यापेक्षा तरी चांगला डान्स करते असे म्हटले आहे. काही वेळापूर्वीच सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन सिंग या तिघांच्या मुलींचा खेळतानाचा व्हिडीयो रैनाने आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला होता. तोही भरपूर गाजला आणि त्यानंतर धोनीने शेअर केलेला झिवाचा हा व्हिडीयो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Csk ms dhoni girl ziva video instagram promoting csk cuteness
First published on: 29-04-2018 at 19:47 IST