भारत हा सांस्कृतिकदृष्ट्या उत्तम देश असून विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. मात्र याची दुसरी बाजू म्हणजे देशात अनेक सिरियल किलर्सही वावरत आहेत. हे लोक अतिशय थंड रक्ताचे असून त्यांच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीमुळे ते चर्चेत असतात. अनेकांना अतिशय निघृणपणे ठार मारणारे हे खतरनाक गुन्हेगार आता नेमके कुठे आहेत, काय करतात हे जाणून घेण्यास अनेकजण उत्सुक असतात. अशाच काही प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न…
ऑटो शंकर
कोकोनट लिकरचा व्यवसाय करणारा म्हणून गोवरी शंकर याची सुरुवातीला ओळख होती. मात्र पुढे ही ओळख बदलली. ८० च्या दशकात चेन्नईतील ९ तरुणींचे अपहरण करुन त्याने या मुलींची अतिशय निघृणपणे हत्या केली. या घटनेनंतर १९९५ मध्ये त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
सायनाईड मोहन
मोहन कुमार नाव असलेला ही व्यक्ती अविवाहीत तरुणींसोबत लैंगिक संबंध ठेवत असे. त्यानंतर त्यांना गर्भनिरोधक गोळ्या देत असे. या गोळ्या सायनाईड असत. २००५ ते २००९ या कालावधीत त्याने २० तरुणींबरोबर अशाप्रकारे केले. अशाप्रकारच्या गुन्ह्यात येण्याआधी मोहन शारीरिक शिक्षणाचा शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्यानंतर २०१३ मध्ये त्याला त्याच्या गुन्ह्यांसाठी मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
चार्लस शोभराज
चार्लस शोभराज बिकिनी किलर म्हणून ओळखला जातो. आशियातील विविध ठिकाणच्या १२ जणांना याने १९७५-७६ या एका वर्षात ठार केले. आपल्या गुन्ह्यांमधील साक्षीदारांचे अपहरण करुन त्यांना उच्च जीवनशैलीमध्ये राहायला देण्याचे काम तो करत असे. पर्यंटकांचा विश्वास संपादन करणे आणि त्यांच्या प्रवासात अडचणी निर्माण करुन त्या सोडवताना त्यांचा गैरफायदा घेण्याचे काम तो करत असे. त्याला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
सायनाईड मल्लिका
या बंगळुरमधील महिलेने १९९९ ते २००७ य अवघ्या आठ वर्षांच्या कालावधीत ६ महिलांचा खात्मा केला. घरगुती हिंसेला बळी जाणाऱ्या महिलांचे सांत्वन करत असताना त्यांना सायनाईड विष देऊन ती ठार करत असे. त्यानंतर या महिलांशी संबंधित व्यक्तींच्या गोष्टींची ती चोरी करत असे. २००७ मध्ये तिला या गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर २०१२ मध्ये ही शिक्षा जन्मठेपेत रुपांतरीत करण्यात आली.
रेणूका शिंदे आणि रुपा गावित
गुन्ह्यांमध्ये महिलाही मागे नाहीत हे काही महिलांनी अतिशय थक्क करायला लावणारे गुन्हे करत सिद्ध केले. या दोन बहीणींना त्यांची आई अंजनाबाई हीने चोरीचे अतिशय उत्तम शिक्षण दिले होते. त्यानुसार त्यांनी लहान मुलांचा वापर करुन हे उद्योग करण्यास सुरुवात केली. लहान मुलांचे अपहरण करुन त्यांच्या पालकांकडे पैशाची मागणी करत असत. यामध्ये १९९० ते १९९६ या काळात त्यांनी ६ मुलांचा खून केला. या दोघींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली असून फाशीवर जाणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला गुन्हेगार ठरतील.
राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम कान्होजी जगताप, मुनावर शाह
अभिनव कला महाविद्यालयातील एकाच बॅचचे विद्यार्थी असणाऱ्या या चौघांनी १९७६-७७ या कालावधीत १० जणांचा खून केला. त्यांनी लावलेला खूनांचा सपाटा ‘जोशी-अभ्यंकर सिरियल मर्डर’ म्हणून ओळखला जातो. देशभरातील अनेक राज्यांमध्ये या चौघांचा शोध घेतल्यानंतर पोलिसांना ते सापडले आणि १९८३ मध्ये त्यांना फासावर चढवण्यात आले.
स्टोनमॅन किलर्स
भारतातील न सुटलेल्या रहस्यांपैकी १९८९ मध्ये झालेली घटना हे आणखी एक रहस्य होते. मंबईमध्ये ९ व्यक्तींना एकदम मारण्यात आले आणि विशेष म्हणजे या ९ जणांना एकाच पद्धतीने मारण्यात आले होते.
अक्कू यादव
अक्कू यादव हा सिरियल किलर म्हणून नाही तर रस्त्यावरील कीलर म्हणून ओळखला जात होता. तो महिलांवर बलात्कार करुन त्यांचा खून करत असे. अशाचप्रकारे बलात्कार करत असताना एका महिलेने त्याचे लिंग कापण्याचे धाडस दाखविले होते.
बिअर मॅन
हा गुन्हेगार जिवंत आहे की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. ऑक्टोबर २००६ ते जानेवारी २००७ या काळात याने मुंबईतील ६ जणांचा खून केला. हा खून समान पद्धतीने करण्यात आला होता, त्यात खून केलेल्या व्यक्तीच्या बाजूला बिअर ठेवण्यात आली होती. जानेवारी २००८ मध्ये रविंद्र कंत्रोळे याला या सर्व गुन्ह्यांमध्ये दोषी ठरविण्यात आले. आता त्याचे मुंबईमध्ये रेस्टॉरंट असून त्याच्यातील बिअर मॅन मागे पडला आहे.
जयशंकर
आतापर्यंत ३० बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या जयशंकरने कारागृहातून पळून जाण्याचाही प्रयत्न केला होता. सध्या तो त्याच्या गुन्ह्यांसाठी ठोठावण्यात आलेली १० वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा भोगत असून त्याच्या इतर २० गुन्ह्यांचे निकाल अजून लागलेले नाहीत.