ही आहे एका लहान बाळाची खोली. यामध्ये बाळाचा पाळणा, टेडिबेअर ठेवेलेले असल्याचे आपल्याला अगदी सहज दिसत आहे. आता चित्र पाहिल्यावर पहिल्या दृष्टीक्षेपात किंवा अगदी नीट पाहिल्यानंतरही तुम्हाला दिसतोय साप ? नाही ना? पण या खोलीत एक साप आहे. तो कुठे ते तुम्हालाच शोधायचे आहे. तेव्हा द्या डोक्याला ताण आणि शोधा हा साप नेमका कुठे आहे ते…

हा साप विषारी आहे त्यामुळे बाळासाठी तर तो धोकादायक आहेच पण इतरांसाठीही धोक्याचा आहे. या बाळाचे बाबा त्याची खोली आवरत असताना त्यांना हा साप दिसला आणि त्यांना धक्काच बसला. आपल्या बाळाच्या खोलीत अचानक हा साप आला कुठून हे त्यांनाही कळाले नाही आणि त्यामुळे ते काहीसे गोंधळले. हा साप ब्राऊन रंगाचा असून तो दडलेला असल्याने सहज दिसत नाहीये. या खोलीचे चित्र ‘सनशाईन कोस्ट स्नेक कॅचर्स’ संस्थेनी आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केला आहे.

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडयेथील एका घरातील ही घटना असून या बाळाच्या वडिलांनी साप दिसल्यानंतर मदतीसाठी धावपळ केली. त्यावेळी त्यांनी साप पकडणाऱ्या लोकांनाही बोलवले. काहीवेळातच ते आले आणि त्यांना बाळाच्या खोलीत एका बॉक्सच्या जवळ पिवळ्या रंगाचे तोंड असलेला साप सापडला. पण हा साप नेमका कुठे आहे तुम्हाला दिसतोय का? या पोस्टला फेसबुकवर मोठ्या प्रमाणात पोस्ट आल्या असून अगदी कमी जणांना त्याचे उत्तर देणे जमले आहे. बाकीच्यांनी मात्र साप कुठे आहे असाच प्रश्न विचारला आहे. पाहा तुम्हाला सापडतो का ते?