Dahi Handi 2023 Kirit Somaiya Dance: मुंबईसह राज्यभरात आज ठिकठिकाणी भव्य दिव्य दहीहंडी सोहळे थाटामाटात पार पडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटांकडून ठाणे- मुंबईत मोठमोठ्या बक्षिसांच्या मानाच्या हंड्या आयोजित करण्यात आल्या आहेत. अशातच दरवर्षी चर्चेत असणारी घाटकोपर मधील राम कदम यांच्या दहीहंडीचा सोहळा याही वर्षी भाव खाऊन गेला आहे. विशेष म्हणजे यंदा राम कदमांच्या दहीहंडी कार्यक्रमात जाऊन भाजप नेते किरीट सोमय्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर सोमय्यांच्या भन्नाट डान्सचे अनेक व्हिडीओ सध्या चर्चेत आहेत.

आज सकाळपासूनच मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. एरवी दरवर्षी कमी- अधिक प्रमाणात दहीहंडीच्या दिवशी पाऊस असतोच पण मागील काही दिवसांपासून मुंबापुरीत पाऊस दडी मारून बसला होता. नेमकं दहीहंडीच्या दिवशीच सकाळपासून सगळीकडेच पावसाने जोर धरला आहे. असं असूनही कुठेच दहिहंडीचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. राम कदम यांच्या दहीहंडीत आज किरीट सोमय्यांनी सुद्धा गोविंदांसह मनसोक्त डान्स करत आनंद लुटला. विशेष म्हणजे भरपावसात गोविंदाच्या खांद्यावर बसून सोमय्या नाचत होते.

Senior minister Chhagan Bhujbal is again in discussion in the background of Lok Sabha elections delhi
दिल्लीत जाण्याच्या भुजबळ यांच्या प्रयत्नांना धक्का? नाशिकवरून महायुतीतच शह-काटशह…
Arvind Kejriwal
अरविंद केजरीवालांची शुगर लेव्हल ३२० वर, अखेर तुरुंगात पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
portfolio Demat accounts New investors stock market
बाजार रंग : पोर्टफोलिओचा डाव मांडताना….

इतकंच नाही तर आज राम कदम यांच्या दही हंडी कार्यक्रमात सोमय्या थरावरही चढले होते.याशिवाय पारंपरिक वेशात आलेल्या काही महिलांसह फुगड्यांचा ताल सोमय्यांनी धरला होता.

किरीट सोमय्यांनी दहीहंडी गाजवली

दरम्यान, दहीहंडीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिवसभरात मुंबई-ठाणे व आसपासच्या तब्बल ३१ मंडळांना भेटी देणार आहेत. यामध्ये राम कदम यांच्या घाटकोपरमधील हंडीचा सुद्धा समावेश आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ८ ठिकाणी हजेरी लावणार आहेत असे समजतेय. यापूर्वी काही दिवसांआधी वारली येथे प्रो- गोविंदा चॅम्पियनशिप सुद्धा जोशात पार पडली. जय जवान गोविंदा पथकाने यंदाच्या प्रो गोविंदाच्या स्पर्धेत बाजी मारली होती.