scorecardresearch

VIRAL VIDEO : लग्नात नवरी आणि तिच्या वडिलांनी केलेला जबरदस्त डान्स परफॉर्मन्स पाहून थक्क व्हाल!

या व्हिडीओमधल्या बापलेकीचे डान्स स्टेप्स पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल.

VIRAL VIDEO : लग्नात नवरी आणि तिच्या वडिलांनी केलेला जबरदस्त डान्स परफॉर्मन्स पाहून थक्क व्हाल!
(Photo: Isnatgarm/ rose.tintedlife)

लग्नात कितीही मजामस्ती असली तरी शेवटचा क्षण भावनिक असतो. तो म्हणजे नवरी मुलीची पाठवणी. नवरीसह तिच्या माहेरच्या सर्व नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी येतं. पण सर्वात भावुक होतो तो बाप. लेक ही वडिलांची खूप लाडकी असते. आपल्या काळजावर दगड ठेवून फुलासारख्या जपलेल्या लेकीला ते सासरी पाठवतात. आयुष्यात कितीही संकट, दुःख आली तरीही कधीच न रडणारा खंबीर मनाचा बाप या क्षणी मात्र खूप हळवा होतो. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो काहीसा वेगळा आहे. लेकीच्या लग्नात अगदी दिलखुलासपणे डान्स करणाऱ्या एका बापलेकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमधल्या बापलेकीचे डान्स स्टेप्स पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ साधारण एक महिन्यापूर्वीचा आहे. पण सध्या तो नव्याने व्हायरल होऊ लागलाय. प्रत्येक बाप आपल्या लेकीच्या लग्नात कसलीच कसर सोडत नाही. दिवस-रात्र एक करून तो आपल्या लेकीच्या लग्नासाठी पै पै जमा करतो. पण ज्या दिवशी लेकीच्या लग्नाचा दिवस येतो त्या दिवशी हा बाप मात्र हळवा होताना दिसतो. पण या व्हिडीओमध्ये बाप आपल्या लेकीच्या लग्नात हळवा न होता अगदी बिनधास्त लेकीच्या लग्नात डान्स करत हा दिवस साजरा करताना दिसतोय. व्हिडीओ पाहिला असता या बापाने वयाची साठी पार केलेली असावी, असा अंदाज येतो. पण वयाच्या साठीमध्ये सुद्धा डान्स करताना वडिलांची उर्जा पाहून तरूण सुद्धा लाजतील. आफल्या लेकीबरोबर जबरदस्त डान्स स्टेप्स करत वडिलांनी सोशल मीडियावरील लाखो लोकांची मनं जिंकली आहेत.

आणखी वाचा : सलमान खानच्या ‘ओह ओह जाने जाना’ गाण्यावर टांझानियन तरूण किली पॉलचा नवा VIDEO VIRAL

या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या नवरी ब्रिटनी रेवेल आणि तिचे वडील कॅली स्वॅग डिस्ट्रिक्ट गाणे “टीच मी हाऊ टू डूगी” या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. त्यांच्या ‘डान्स थ्रू द डिकेड्स’ शोचा एक भाग म्हणून हा डान्स करण्यात आला, ज्यामध्ये टुटसी रोल, हॅमर डान्स आणि कार्लटन यांचाही समावेश होता. लग्नातील पाहुणे सरप्राईज आणि नॉस्टॅल्जिक डान्स पाहणे पसंत करतील, हे वडील कॅली यांना चांगलंच माहित होतं.

आणखी वाचा : हुबेहुब माणसासारखं ऊस खातो हा क्यूट पांडा , VIRAL VIDEO पाहून म्हणाल कमाल आहे!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : किंग कोब्राला किस करायला निघाला हा माणूस आणि मग पुढे काय घडलं? पाहा VIRAL VIDEO

नवरी ब्रिटनी रेवेल ही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर बरीच सक्रिय असते. हा व्हिडीओ तिने स्वतः व्हिडीओ कॅप्शनसह पोस्ट केला आहे, “माझ्या वडिलांना माझ्या मिडल स्कूलमधील काही गो-टू मूव्ह शिकवताना किती मजा आली हे देखील सांगू शकत नाही” असं लिहित हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. त्यानंतर बघता बघता हा व्हिडीओ व्हायरल देखील झाला. या व्हिडीओला आतापर्यंत दोन लाख लाईक्स आणि अनेक कमेंट्ससह लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक यूजर्सनी या बापलेकीच्या बॉण्डिंगचं कौतूक करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या