डॉल्फिनने मुलीसोबत धरला ठेका; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

डॉल्फिनने एका सुंदर मुलीसोबत ठेका धरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Dolphin_Dance
डॉल्फिनने मुलीसोबत धरला ठेका; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर रोज नवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता डॉल्फिनने एका सुंदर मुलीसोबत ठेका धरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. डॉल्फिन मांसाहरी जलचर असून त्याला मासे खाणे आवडतं. डॉल्फिनने मासे खाल्ल्यानंतर मुलीसोबत ठेका धरल्याचा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल आणि म्हणाल हा डॉल्फिन किती बुद्धिमान आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक डॉल्फिन पाण्यातून जमिनीवर आला आहे. तसेच त्याच्या शेजारी काळी जीन्स आणि लाल टी-शर्ट घातलेली एक मुलगी आहे. डॉल्फिनसमोर एका छोट्या बादलीत बरेच मासे ठेवलेले असून ती मुलगी त्यातून काही मासे उचलते आणि डॉल्फिनला खायला घालते. त्यानंतर ती डॉल्फिनच्या शेजारी उभी राहून नाचू लागते. हे पाहून डॉल्फिनही आपले शरीर आणि शेपूट हलवतो आणि मुलीसोबत नाचू लागतो. या व्हिडिओला नेटकरी पसंती देत आहेत.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ब्यूटिफुलग्राम नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कुठे शूट करण्यात आला आणि डॉल्फिनला माशांना खाऊ घातल्यानंतर नाचणारी मुलगी कोण आहे?, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. आतापर्यंत या व्हिडिओला दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर सहा हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे.

केंद्र सरकारने २०१० मध्ये गंगा नदीत आढळणाऱ्या डॉल्फिनला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केले होते. डॉल्फिन पाण्याखाली १०-१५ मिनिटेच राहू शकतो. डॉल्फिनला श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dancing dolphin video viral on social media rmt

ताज्या बातम्या