भारतासह जगात असे विषारी साप आहेत, ज्यांना पाहून भल्या भल्यांना घाम फुटतो. कदाचित तुम्हाला माहिती नसेल की आपल्या आजूबाजूला असे अनेक साप आहेत जे अजिबात विषारी नसतात, म्हणजेच त्यांच्या दंशाने तुमची हानी होत नाही. पण अनेकांना हे माहीत नसल्यामुळे ते घाबरून जातात. त्याऐवजी तिथून ते सापाला मारायला धावतात.

साप कुठलाही असो, त्याला बघून सर्वांची घाबरगुंडी उडते. मात्र वनविभागाच्या एका महिला अधिकाऱ्याने एका विषारी सापाला इतक्या सहजतेने कंट्रोल केलं आहे की, ते पाहून तुमचे डोळे विस्फारून जातील. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : कंटेनरमधून थेट ट्रकच्या छतावर पोहोचली ही गाय, पुढे जे झालं ते पाहून हसू आवरणार नाही

हा व्हिडीओ केरळमधील तिरुवनंतपुरममधील कट्टाकडा इथला आहे. एका घराजवळ विषारी साप आल्याची खबर वनविभागाला मिळाली, त्यानंतर वनविभागाची टीम तिथे पोहोचली. या व्हिडीओमध्ये रोशनी नावाची वनविभागाची महिला अधिकारी या सापाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करते. ती सापाला एका निळ्या गोणीत घेऊन जाते आणि साप स्वतःला वाचवण्यासाठी त्या गोणीत शिरतो. यानंतर रोशनीने त्या सॅकला गाठ मारून सापाला सुरक्षित ठिकाणी नेलं.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : मृत्यूच्या अगदी जवळ पोहोचला होता, पण असा काही चमत्कार घडला की पाहून तुम्हीही व्हाल हैराण!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : पेटिंग करणारा हत्ती कधी पाहिलाय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

हा व्हिडीओ IFS अधिकारी सुधा रमन यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. “रोशनी या धाडसी महिला वनकर्मचाऱीने कट्टाकमधील मानवी वस्तीतून एका सापाला वाचवले. त्या साप पकडण्यात तरबेज आहेत. देशभरातील वनविभागात महिलांची संख्या चांगल्या प्रमाणात वाढत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४५ सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत ४४ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याच वेळी १९०० हून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाइक देखील केलं आहे. या व्हिडीओच्या कॉमेंट बॉक्समध्ये रोशनीचं कौतुक करताना लोक थकत नाहीत.