Todays Viral News : सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ वेगवेगळ्या घटनांचे असतात. हेच व्हिडीओ नेटकरी सोशल माध्यमांवर शेअर करतात. कधी-कधी एखाद्या मजेशीर घटनेचेही व्हिडीओ नेटकरी शेअर करत असतात. आता अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक व्यक्ती दारू मिळण्यासाठी करत असलेली धडपड पाहून अनेकजण पोटधरून हसत आहेत.

खरं तर दारूप्रेमींचं एक जग वेगळंच असतं. अनेक घटना अशाही समोर आलेल्या आहेत की त्यांची नशा नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा वेळ, ठिकाण आणि प्रतिष्ठेचीही पर्वा त्यांना नसते. अशातच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एक व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण ‘दारू का चक्कर बाबू भैया’ अशा प्रकारच्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

झालं असं की, दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने दुकानातून दुसरी बाटली घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला काही दारूची बाटली घेता येईना. त्यानंतर तो खूप अस्वस्थ झाला. मग त्याने त्या दारूच्या दुकानाला असलेल्या लोखंडी ग्रिलमध्ये स्वत:ची मान घातली आणि हाताने दुकानातील एक दारूची बाटली घेतली. मात्र, बाटली हातात घेतल्यानंतर त्या व्यक्तीचं डोक त्या दुकानाच्या लोखंडी ग्रिलमध्ये अडकलं. त्यामुळे त्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला.

या घटनेचा व्हिडीओ नेटकऱ्यांनी इंस्टाग्राम आणि एक्सवर (ट्विटर) शेअर केला आहे. तसेच या घटनेचं वृत्त इंडियन एक्सप्रेसनेही दिलं आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये संबंधित व्यक्तीने दारूची बाटली हातात पकडलेली दिसत आहे. मात्र, स्वत:चं डोक अडकलेलं असतानाही त्याने ती बाटली सोडली नाही. उलट तो ती बाटली धरून डोके सोडवण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या काही व्यक्ती त्याला मदत करताना दिसत आहेत. पण तरीही दुकानाच्या लोखंडी ग्रिलमधून त्याचं डोकं सहजपणे काढता येत नसल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर अखेर तेथील दुसऱ्या माणसांनी लोखंडी ग्रिल जोराने ओढलं आणि त्या अडकलेल्या व्यक्तीचं डोकं त्यामधून निघाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हायरल व्हिडिओ येथे पाहा:

युजर्सने काय प्रतिक्रिया दिल्या?

एका युजर्सने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की ‘दारू का चक्कर बाबू भैया’, तर दुसऱ्या युजर्सने म्हटलं की, “डोकं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना त्याने एका क्षणासाठीही ती बाटली सोडली नाही. समर्पण!”, तसेच आणखी एका युजर्सने म्हटलं की, “त्यांनी लोखंड वाकवून पुन्हा सरळ करण्यासाठी वाहनाचा जॅक वापरायला हवा होता,” तर आणखी एका युजर्सने म्हटलं की, “माझा दिवस खराब न केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.”