काही वर्षांपूर्वी आई- वडिल आपल्या मुलांसाठी योग्य वर आणि वधू शोधण्यासाठी धडपड करत असत. बऱ्याच वेळा ते आपल्या मुला-मुलींची नावे विवाह जुळवणाऱ्या संकेत स्थळांमध्ये नोंदवायचे. तरी कधी कोणत्या नातेवाईकांनी सांगितलेल्या व्यक्तीच्या घरी जाऊन किंवा शेजारी मुलाची चौकशी करत असत. पण आता काळ बदलला आहे. या डिजिटल वर्ल्डच्या दुनियेत काय होईल याचा नेम नाही. याचे एक उदाहरण म्हणजे सध्या सोशल मीडियावर चर्चेत असणारे एका मुलीचे ट्विट. या मुलीने तिच्या आईच्या लग्नासाठी स्थळ शोधण्यासाठी ट्विटरवर पोस्ट केली आहे.

आशा शर्मा असे या मुलीचे नाव आहे. आशा आपल्या आईसाठी ५० वर्षांच्या आसपास नवऱ्या मुलाच्या शोधात आहे. तो मुलगा शोधताना आशाने तीन अटी देखील घातल्या आहेत. तो मुलगा निर्व्यसनी, शाकाहारी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असायला हवा असे म्हटले आहे. आशा आपल्या आईच्या आयुष्यात रंग भरण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचे सर्वच स्थरांतून कौतुक होत आहे.

आशाने तिचा आणि तिच्या आईचा फोटो शेअर करत ‘माझ्या आईसाठी मी ५० वर्षांच्या आसपास नवऱ्या मुलाच्या शोधात आहे. मुलगा शाकाहरी आणि निर्व्यसनी असावा’ अशी अट घातल तिने ट्विट केले आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी तुम्हाला चांगला मुलगा मिळवून देण्यासाठी मी हे व्हॉट्सअॅपवर पोस्ट करु का?, तु खूप चांगले काम करत आहे असे म्हणत लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

आशाबद्दल बोलायचे झाले तर आशाने तिच्या प्रोफाइलमध्ये ती कवियत्री, नेल आर्टिस्ट आणि राजकीय निरीक्षक असल्याचे म्हटले आहे.