युजवेंद्र चहल आणि धनश्रीच्या नात्यात फूट? आधी इन्स्टाग्रामवरून नाव केलं डिलीट आणि आता..

धनश्रीने लग्नानंतर आपल्या इंस्टाग्राम आयडीमध्ये चहल अडनावसुद्धा जोडले होते.

युजवेंद्र चहल आणि धनश्रीच्या नात्यात फूट? आधी इन्स्टाग्रामवरून नाव केलं डिलीट आणि आता..
युझवेन्द्र चहल आणि धनश्रीच्या नात्यात फूट? (फोटो: Instagram)

टीम इंडियाचा स्पिनर युजवेंद्र चहल याने काही वर्षात आपले एक वेगळे हक्काचे स्थान मिळवले आहे. क्रिकेटच्या मैदानात गंभीर खेळी दाखवणारा चहल खऱ्या आयुष्यात मात्र किती खेळकर आहे हे सोशल मीडियाने वेळोवेळी दाखवून दिले आहे. चहल इतकीच त्याची पत्नी धनश्री वर्मा सुद्धा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. धनश्री स्वतः कोरिओग्राफर असल्याने तिचे डान्स व्हिडीओ पोस्ट करून तिने सुद्धा आपला फॅन ग्रुप बनवला आहे. अनेकदा धनश्री भारतीय क्रिकेट टीममधील खेळाडूंसोबत सुद्धा रील्स बनवते, काही दिवसांपूर्वी तिने श्रेयस अय्यर सोबत एक डान्स रीलही केला होता. ज्यानंतर सोशल मीडियावर भलत्याच चर्चा रंगल्या होत्या. अनेकांनी तर आता दिनेश कार्तिक सोबत जे झाले तेच युजवेंद्रसोबत पण होईल असे अंदाज वर्तवले होते.

सेलिब्रिटी म्हंटल्यावर अशा चर्चा होणे काही नवीन नाही मात्र धनश्री आणि चहलच्या अलीकडच्या इंस्टाग्राम पोस्टमुळे खरोखरंच नेटकऱ्यांचं भाकीत खरं होतंय का असा प्रश्न पडू लागला आहे. धनश्रीने लग्नानंतर आपल्या इंस्टाग्राम आयडीमध्ये चहलसुद्धा जोडले होते. मात्र अलीकडेच तिने युजवेंद्रचे आडनाव काढून आपले इंस्टाग्राम वरील नाव केवळ धनश्री वर्मा असे केले आहे.

धनश्री वर्मा इंस्टाग्राम

इतकंच नव्हे तर धनश्रीने हॅण्डल नाव बदलल्यावर चहलने सुद्धा आपल्या इन्स्टावर एक स्टोरी पोस्ट केली होती. नवीन आयुष्याची सुरूवात असं लिहिलेली हि स्टोरी चहलने काही वेळ ठेवून डिलीट केली. खरंतर ही स्टोरी पाहून अनेकांनी चहल आणि धनश्री आता आई- बाबा होणार का असेही अंदाज व्यक्त केले होते मात्र चहलने स्टोरी डिलीट केल्यामुळे आता या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय असेच दिसून येत आहे.

युजवेंद्र चहल इंस्टाग्राम

दरम्यान या दोघांच्याही अकाउंटवर अजून एकमेकांसोबतचे फोटो आहेत. त्यांच्यात सगळे अलबेल आहे की नाही हे येत्या काळात समजेल. चहल सध्या आशिया कप २०२२ च्या तयारीत आहे, ऑगस्ट २८ ला पाकिस्तान सोबतच्या मॅच मध्ये त्याच्याकडून टीम इंडियाला मोठ्या अपेक्षा आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dhanashree verma removes chahal from instagram yuzvendra shares story new life loading svs

Next Story
Viral Video: आदित्य ठाकरेंच्या भाषणादरम्यान BJP कार्यालयातून भाजपा कार्यकर्ते काढत होते फोटो; ही गोष्ट लक्षात येताच…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी