मुलांचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात. धोनीची चिमुकली झिवा हिने ते सिद्ध करुन दाखलंय. धोनीची मुलगी लवकरच दोन वर्षांची होईल.  ती मोठी होऊन नक्कीच ती आपल्या बाबांसारखी होईल असे हे फोटो बघणा-याला प्रत्येकाला वाटेल.

वाचा : मोदींना दिलेल्या लग्न पत्रिकेत युवराजने केली मोठी चूक

आपली चिमुकली झिवा आणि पत्नी साक्षीला घेऊन धोनीने एका फुटबॉल सामन्यात उपस्थिती लावली होती. जवाहरलाल स्टेडियमध्ये ‘चेन्नई एफसी’ विरुद्ध ‘नॉर्थईस्ट यूनायटेड एफसी’ असा सामना सुरू होता. यात चेन्नई एफसी संघाला प्रोत्साहित करण्यासाठी धोनी मैदानात दाखल झाला होता. संघाच्या चांगल्या खेळीवर आणि गोलवर तो टाळी वाजवून दाद देत होता. विशेष म्हणजे धोनीची चिमुकली झिवाही त्याचे अनुकरण करत होती. गोल झाला की तिही टाळ्या वाजवून संघाला प्रोत्साहित करत होती. खरं तर त्या चिमुकलीला या खेळातले काहीच कळत नसलं तरी चांगल झाल्यावर टाळ्या वाजवून दाद द्यायचे हे तिने आत्मसात केले. धोनीची पत्नी साक्षीनेह हे फोटो सोशल मीडियावर टाकल्यावर ते व्हायरल झाले. त्यामुळे झिवा धोनीच्या आवडीप्रमाणे फुटबॉलर होणार की काय असेच सगळ्यांना वाटू लागले आहे.

क्रिकेट सामन्यामुळे धोनीला आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवयाला मिळत नाही. पण सध्या कसोटी सामने सुरु असल्याने धोनीला काहीसा उसंत मिळाला आहे. त्यामुळे पूर्ण वेळ तो लाडक्या झिवासाठी राखून ठेवत आहे. झिवा ही फेब्रुवारी महिन्यात २ वर्षांची होणार आहे.

https://twitter.com/DHONIism/status/802545983150292992