Viral video: जर तुम्ही खवय्ये असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी धक्कादायक ठरू शकते. वेगवेगळ्या ठिकाणी, विशेषतः हॉटेलमधलं चमचमीत खाणाऱ्या लोकांना हा व्हिडीओ पाहून धक्काच बसेल. एका धक्कादायक घटनेत, उत्तर प्रदेशातील कानपूरमधील एका हॉटेलमध्ये जेवताना तंदुरी रोटीमध्ये चक्क मृत पाल आढळल्याने एक ग्राहक आजारी पडला. हॉटेल आणि ढाब्यांमध्ये तंदुरी रोटी ही लोकप्रिय पसंती आहे, परंतु ती खाणे धोकादायक ठरू शकते, कारण अस्वच्छ पद्धतीने बनवण्याच्या पद्धती तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. आपण अनेकदा जेवणासाठी स्वच्छ हॉटेल, रेस्टॉरंटची निवड करतो. मात्र अशा हॉटेलमध्ये जरा किळसवाणा प्रकार दिसला तर आपला हिरमोड होतो. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओही व्हायरल झाला असून यापुढे हॉटेलमध्ये जाताना तु्म्हीही शंभर वेळा विचार कराल.
हॉटेलमधील चमचमीत जेवण सर्वांनाच आवडतं. मात्र, याच हॉटेलच्या जेवणाचे किळसवाणं रुप सध्या उघड झालं आहे.सगळा प्रकार पाहिल्यानंतर आता हॉटोलमध्ये जाऊन जेवणार असाल तर १०० वेळा विचार करा.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ग्राहक ढाबा मालकाशी मृत पाल सापडलेल्या तंदुरी रोटी दाखत जाब विचारत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, रोटीमध्ये मृत पाल अडकल्याचं दिसत आहे. एवढंच नाहीतर ही रोटी खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्याही झाल्या. अशाप्रकारे हॉटेलमध्ये खाणं कसं जिवावर बेतू शकतं हे या व्हिडीओमध्ये दिसत आहे . कानपूरमधील चौबेपूर पोलिस स्टेशन परिसरातील ढाबा रमैया येथे ही घटना घडल्याचे वृत्त आहे. ही घटना घडली तेव्हा ती व्यक्ती त्याच्या कुटुंबासह ढाब्यावर जेवण करत होती.
या घटनेमुळे या हॉटेल आणि ढाब्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या स्वच्छतेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे. या रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेमुळे ते ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. या घटनेची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आल्याचे वृत्त आहे, त्यानंतर हॉटेलविरुद्ध चौकशी सुरू केली जाऊ शकते.
पाहा व्हिडीओ
सध्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी या हॉटेल्सवर आणि मालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर या पुढे हॉटेलमध्ये जेवण करणे योग्य आहे का? असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.