जेव्हा आपण अन्नाची नासाडी करतो तेव्हा केवळ अन्नच नाही तर शेतकऱ्याची मेहनतही वाया घालवतो. शेतात पिकं पिकवण्यापासून ते बाजारात आणण्यापर्यंत शेतकरी किती कष्ट करतात याची आपल्याला कल्पना नाही. पीक काढणीचे कामही खूप कठीण असतं. तुम्ही शेतात शेतकरी आणि मजूरांना पीक कापतानाचा व्हिडीओ पाहिलं असेल, पण कुत्र्याला पीक कापणी करताना तुम्ही कधी पाहिलंय का? सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कुत्रा शेतकऱ्याची मदत करण्यासाठी पुढे सरसावला आणि आपल्या दातांना सपासप पीक कापणी करताना दिसला.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दिवाळी जवळ आली की पिक कापणीचा हंगाम सुरू होतो. सहसा लोक स्वतः आणि त्यांचे कुटुंब शेतात पिकांची कापणी करतात. शेत जेवढे मोठे तेवढे मजूर कामाला येतात. त्यापेक्षा मोठे क्षेत्र असल्यास यंत्राचा वापर केला जातो. सध्या कापणीचा हा व्हिडीओ पाहून मात्र लोकांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. या व्हिडीओमध्ये शेतकऱ्याला शेतात राबताना पाहून त्यांचा कुत्राही त्यांच्या मदतीला येतो. आपल्या दातांनी तो उभं पिक सपासप कापताना दिसतो. शेतात मक्याचे पीक असून ते काढणीची वेळ आली आहे. हा कुत्रा तोंडाने एक एक करून पिके आपल्या दातात घेऊन कापतो आणि जमिनीवर ठेवत आहे. तो आपल्या दाताने इतक्या सहजतेने पीक कापत आहे की त्याच्या दातांमध्ये चाकू आहे की काय असं वाटू लागतं.
आणखी वाचा : याला म्हणतात टीम वर्क! हा VIRAL VIDEO एकीचे बळ दाखवतो…
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : काचेसारखा चकाकणारा ऑक्टोपस कधी पाहिलाय का? पाहून लोक आश्चर्यचकित झाले
हा व्हिडीओ @manojpehul नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहून लोक या कुत्र्याच्या हूशारीचं कौतूक करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत १ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर पाच हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. एक यूजर म्हणाला की, “आणखी काय बघायला मिळेल माहीत नाही, या युगात कुत्र्यासारखं वागून माणूस कुत्रा होतोय आणि कुत्रा माणसासारखं वागून माणूस बनतोय.” व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मनोज शर्माच्या वतीने अनेक मजेदार गोष्टी लिहील्या आहेत. त्यांनी लिहिले की “यावेळी संपूर्ण शेतीचे कंत्राट त्यांना देण्यात आले आहे!”