भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. बाबासाहेब दलितांचे नेते होते, ते राज्यघटनेचे शिल्पकार होते. ज्या दलितांना सारे हक्क नाकारले गेले त्यांच्यासाठी ते शेवपर्यंत लढले. दलितांना संघटित केले, जो समाज दबला गेला होता त्या समाजाला स्वाभिमानाने आणि स्वत:च्या हक्कांसाठी लढायला बाबासाहेबांनी शिकवले. भारतीय समाजाला संवैधानिक, सामाजिक स्वातंत्र्यता मिळून देण्यात आंबेडकर यांनी मोलाची कामगिरी केली. ज्या काळात दलितांना सारे हक्क नाकारले त्याकाळात सा-या उपेक्षा हाल सहन करत शिकण्याच्या ध्यास त्यांनी घेतला. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास ते मानववंशशास्त्र, धर्म, कायदा अशा अनेक विद्याशाखांचा अभ्यास त्यांनी केला फक्त मराठीच नाही तर हिंदी, इंग्रजी, पाली, पर्शियन आदी भाषांवर त्यांनी प्रभुत्त्व मिळवलं. त्यांचा हा प्रवास अनेक संघर्षांनी भरलेला होता, पण तरीही जिद्दीने उभं राहून आपल्या समाजाला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. या महामानवाच्या कार्याला प्रणाम! माणसांप्रमाणे विचारही नश्वर असतात म्हणूनच चांगल्या विचारांचा नेहमीच प्रचार आणि प्रसार करायला हवा असं बाबासाहेबांचं मत होतं म्हणूनच बाबांसाहेबांचे संकलित केलेले काही प्रभावशाली विचार..
* शिका, संगठिक व्हा आणि संघर्ष करा
* शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.
* मी असा धर्म मानतो जो स्वांतत्र, समता आणि बंधुभावाची शिकवण देतो.
* हक्क मागून मिळत नसतो त्यासाठी तुम्हाला संर्घष करावा लागतो.
* माणूस धर्माकरिता नाही, तर धर्म माणसाकरिता आहे
* तुमच्या मताची किंमत मीठ- मिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल, तेव्हा मत विकत घेऊ पाहणा-यांइतके कंगाल कोणीच नसेल.
* जो प्रतिकुल मतांना घाबरून जात नाही, दुस-यांचे हातचे बाहुले न होण्याइतकी बुद्धी ठेवतात ज्याला स्वाभिमान आहे तोच माणूस स्वतंत्र्य आहे.
* नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा.
* जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रूपयाचं पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जागायचं हे शिकवेल.
* आयुष्य मोठं नाही तर महान असावं
* लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये, की जेणे करुन त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उदध्वस्त करण्यासाठी उपयोग करेल.
* संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही
* ज्या दिवशी मला वाटेल की संविधानाचा दुरूपयोग केला जात आहे त्यादिवशी मी ते जाळून टाकेन.
* ज्या वर्गातील महिलांची प्रगती अधिक केली तो वर्ग मी अधिक प्रगतिशिल मानतो.
* महान व्यक्ती ही नेहमी प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा वेगळी आहे कारण महान व्यक्ती समाजाचा पाईक होण्यासाठी सदैव तयार असते.
* माणूस ज्या समजात राहतो त्या समाजात गेल्यावर त्याची ओळख पुसता कामा नये, प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे तो फक्त समाजाच्या विकासासाठी नाही तर स्वत:चा विकास करण्यासाठी जन्माला आलेला आहे.