गुढीपाडव्याला ५ मिनिटात काढता येईल सुंदर रांगोळी, ‘या’ हटके डिझाईन लगेच सेव्ह करुन ठेवा

Gudi padawa 2023: प्रत्येक गृहिणीली, स्त्रीला आपल्या दारातली रांगोळी ही छान आणि हटके अशी हवी असते. आपला कोणताही सण रांगोळीशिवाय पूर्ण होत नाही.

Gudi Padwa rangoli
गुढीपाडव्यानिमित्त सुंदर रांगोळी(सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Gudhi Padwa 2023 : हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा उत्साह पाहायला मिळतो. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण घरोघरी गुढ्या उभारतात. यादिवशी गुढीच्या बाजुला तसेच दाराबाहेर रांगोळी काढली जाते. प्रत्येक गृहिणीली, स्त्रीला आपल्या दारातली रांगोळी ही छान आणि हटके अशी हवी असते. आपला कोणताही सण रांगोळीशिवाय पूर्ण होत नाही. तुम्हालाही गुढीपाडव्यानिमित्त दारात सगळ्यापेक्षा हटके रांगोळी काढायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी रांगोळीच्या काही सोप्या आणि हटके डिझाईन्स घेऊन आलो आहोत.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हिंदू धर्मात रांगोळीचे खूप महत्व आहे. प्रत्येक शुभ प्रसंगी रांगोळी काढली जाते, गुढीपाडवा हा दिवस सर्वांसाठी खास असतो त्यामुळे सजावट, सुंदर रांगोळी आणि गुढी उभारण्यापासून सर्व गोष्टी सणाचा उत्साह आणखी वाढवता, आम्ही रांगोळीचे काही व्हिडीओ घेऊन आलो आहोत, त्यामुळे तुमचे काम आणखी सोपे होणार यात काही शंका नाही. chaitali_art_n_crafts या अकाऊंटवर गुढीपाडव्यानिमित्त खास रांगोळीचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

पाहा रांगोळी व्हिडीओ –

हेही वाचा – गुढीपाडव्याचा खास बेत, घरच्या घरी तयार करा हे ‘आंबट-गोड’ वरण; जाणून घ्या सोपी रेसिपी

रांगोळीमध्ये असंख्य प्रकार आहेत. ठिपक्यांची रांगोळी, मोराची सोपी रांगोळी, फुलांची रांगोळी अश्या विविध रांगोळी तुम्ही यंदा काढू शकतात. यासोबतच गुढीपाडव्यानिमित्त पारंपारिक संस्कार भारती रांगोळी यंदा तुम्ही दाराबाहेर किंवा गुढी उभारलेल्या परिसरात काढू शकता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 10:39 IST
Next Story
खरे स्पायडरमॅन? दुबईत गगनचुंबी इमारतीच्या काचेवर चढली माणसं; ‘हा’ Video पाहून भरेल धडकी
Exit mobile version