भारतात भररस्त्यात दारू पिऊन गोंधळ निर्माण करणारे तुम्ही अनेक लोक पाहिले असतील. दारूच्या नशेत हे लोक काहीही करताना दिसतात. अनेकदा काही जण पोलिसांशी हुज्जत घालतात; तर काही जण मारण्यासाठी कोणाच्याही अंगावर धावून जातात. अशा प्रकारच्या घटनांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडेच अशीच एक घटना भोपाळमध्ये घडली. येथे कारने भररधाव येणाऱ्या दारूच्या नशेतील एका व्यक्तीने महिला न्यायदंडाधिकाऱ्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. इतकेच नाही, तर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनाही त्याने मारहाण केली. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये झालेल्या या अपघाताची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण, तरुणाने भररस्त्यात पोलिसांवरच हल्ला करीत त्यांना मारहाण केली. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक व्यक्ती पोलिसांना मारहाण करीत असल्याचे दिसतेय. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दारूच्या नशेत एक व्यक्ती पोलिसांशी झटापट करीत आहे; तर पोलिसही त्याला काठीने मारत आहेत.

Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
navi Mumbai lok sabha voting
Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting Live: महाराष्ट्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८.६६ टक्के मतदान!
Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Mahabaleshwar
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी साताऱ्यात ६२० एकर जमीन विकत घेतली, पण कुणालाच पत्ता नाही! महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार उघड
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाची आई कॅमेरासमोर ढसाढसा रडली, म्हणाली; “प्लीज..”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Iran President Ebrahim Raisi Died in Helicopter Crash in Marathi
Ebrahim Raisi Helicopter Crash: इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, देशावर शोककळा

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सर्वप्रथम मद्यपी व्यक्तीने महिला दंडाधिकाऱ्यांच्या गाडीला धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच हबीबगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. घटनास्थळी दारूच्या नशेत असलेल्या त्या व्यक्तीने हाणामारी सुरू केली. त्या तरुणाने पोलिस कर्मचाऱ्याला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली; मात्र इतर पोलिसांनी त्याला सोडवले आणि मग त्या नशाबाज तरुणाला लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. त्यादरम्यान तो तेथून पळून गेला.

ही घटना रात्री ३ वाजण्याच्या सुमारास घडली. बन्सल फॉरेस्टजवळ महिला दंडाधिकाऱ्यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अपघाताच्या वेळी दंडाधिकारी कारमध्ये उपस्थित होत्या. दारूच्या नशेत असलेल्या तरुणाने भरधाव कारने अपघात केल्यानंतर रस्त्यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने पोलिस हवालदाराला मारहाण केली आणि पोलिसांकडूनही त्याला दंडुक्यांचे तडाखे बसत असतानाच त्याने पलायन केल्याचे सांगण्यात आले.

मात्र, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस आणि दारूबाज तरुणाच्या वागणुकीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी वाहन क्रमांकाच्या आधारे मद्यपी चालकाविरुद्ध वेगवेगळ्या कलमांतर्गत एफआयआर नोंदवून त्या मद्यपीचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याचे वाहनही जप्त केले आहे.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक प्रश्न उपस्थित करीत आहेत की, रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत तो तरुण गाडी चालवतच कशी होता? शहरात रात्रीच्या वेळी तपासणी होत नाही का? महिला न्यायदंडाधिकाऱ्यांच्या गाडीला त्या मद्यपीची भरधाव कार धडकल्यानंतर तो पोलिसांसमोरही तो तरुण इतका मग्रुरीने वागत होता; मग तो सामान्य माणसाशी कसा वागला असता?