Dubai princess Sheikha Mahra engaged French Montana: संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान बिन राशिद अल मकतूम यांची मुलगी शेख महराने (वय ३१) मागच्या वर्षी आपल्या पतीला इन्स्टाग्रामवरून घटस्फोट दिला होता. आता तिने मोरोक्कन-अमेरिकन रॅपर फ्रेंच मोंटाना याच्याबरोबर साखरपुडा केल्याची माहिती समोर येत आहे. शेख महराने जुलै २०२४ मध्ये आपल्या पतीला इन्स्टाग्राम पोस्टद्वारे घटस्फोट दिला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात तिने DIVORCE या नावाने परफ्युम लाँच केला होता.
मोंटानाच्या प्रतिनिधीने टीएमझेडला सदर साखरपुड्याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी या जोडप्याने जून महिन्यात पॅरिस फॅशन विकदरम्यान आपल्या नात्याची कबुली दिली होती. ३१ वर्षीय शेख महरा आणि ४० वर्षीय रॅपर फ्रेंच मोंटाना हे २०२४ मध्ये एकमेकांच्या जवळ आले होते. रॅपर मोंटाना दुबईच्या दौऱ्यावर असताना शेख महराने त्याला दुबईची सफर घडवली होती.
दुबईत ओळख झाल्यानंतर दोघेही दुबई आणि मोरोक्को मधील अनेक ठिकाणी एकत्र दिसले होते. महागड्या रेस्टॉरंट्समध्ये जेवण, कधी मशिदींना भेट आणि कधी पॅरिसच्या पॉन्ट डेस आर्ट्स पुलावर हे जोडपे एकत्र दिसले होते. पॅरिसमध्ये झालेल्या फॅशन इव्हेंटमध्ये शेख महरा आणि रॅपर फ्रेंच मोंटाना हातात हात घालून आल्याचे दिसल्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध सार्वजनिक झाले होते.
शेख महरा आणि मोंटाना यांच्या दोघांच्या कुटुंबियांनी साखरपुड्याला मान्यता दिली आहे. मात्र अद्याप लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही.
कोण आहे फ्रेंच मोंटना?
फ्रेंच मोंटानाचे खरे नाव करीम खारबूच असे आहे. ‘अनफरगेटेबल’ आणि ‘नो स्टायलिस्ट’ या गाण्यांनी त्याला जगभरात ओळख प्राप्त करून दिली. युगांडा आणि उत्तर अमेरिकेत आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या परोपकारी कामांमुळे त्याला एक वेगळी प्रतिष्ठा लाभली. फ्रेंच मोंटानाचे व्यावसायिक आणि डिझाइनर नदीम खारबूचशी लग्न झाले होते. २००७ ते २०१४ या काळात ते एकत्र होते. त्यांना १६ वर्षांचा क्रूझ खारबूच नावाचा मुलगाही आहे.

२०२३ मध्ये झालं होतं शेख महराचे लग्न
शेख महराचे २०२३ मध्ये बिन मोहम्मद बिन रशीद बिन माना अल मकतूम यांच्याशी लग्न झाले होते. त्यानंतर त्यांना एक मुलगीही झाली. मुलीचा जन्म झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात शेख महराने घटस्फोट घेतल्याचे इन्स्टाग्रामवर जाहीर केले होते. शेख महराने आरोप केला की, तिचे पती दुसऱ्या महिलेच्या प्रेमात होते, त्या दोघांचे अफेअर सुरू असल्यामुळे मी त्याच्यापासून विभक्त होत आहे.
शेख महराने नंतर डिलीट केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते, “प्रिय पती, तू इतर काही लोकांबरोबर व्यस्त असल्याने मी घटस्फोट जाहीर करते. मी तुला घटस्फोट देते, घटस्फोट देते, घटस्फोट देते.”