सोशल मीडियावर एका गरुड पक्षाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. दिवसेंदिवस व्हायरल होणाऱ्या ऑप्टिकल फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी माणसांना शोधण्यात अडचणी येतात. कारण त्या फोटोंमध्ये असलेल्या गोष्टी पाहण्यासाठी गरुडासारखी नजर असावी लागते, असं म्हणतात. होय, ते सत्यच आहे. कारण एका गरुडाने समुद्रातील माशाची शिकार केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. आकाशात हजारो फूट उंचीवर उडणारा गरुड पाण्यात लपलेल्या माशाची काही सेकंदातच शिकार करून पसार होतो, हे सर्व दृष्य कॅमेरात कैद झाले आहेत.

गरुड पक्षी आकाशात हजारो फूट उंचीवर उडताना दिसतो. पण त्याची नजर इतकी तीक्ष्ण असते की, जमिनीवर किंवा पाण्यात असणाऱ्या सापांची किंवा माशांची शिकार करणं त्याला सोपं वाटतं. समुद्रात पोहणाऱ्या एका माशालाही त्याने पायाच्या पंज्यात अडकवून गगनभरारी घेतल्याचं एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. आकाशात उडत असताना एका गरुडाने समुद्राच्या पाण्यात शांतपणे झेप घेतली आणि माशाची शिकार केली. गरुडाकडे शिकार करण्याची जबरदस्त स्टाईल कॅमेरात कैद झाली आहे. गरुड पाण्याच्या दिशेनं येत असल्याचा जरही अंदाज माशाला आला नसावा, असंच या व्हिडीओत दिसत आहे. woww.clicks नावाच्या इन्स्टाग्राम युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

नक्की वाचा – नडला त्याला वाघाने फाडला! आख्ख्या गावासमोर वाघाने शेतकऱ्यावर मारला पंजा, थरारक Video कॅमेरात झाला कैद

इथे पाहा गरुडाचा थरारक व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Woww Clicks (@woww.clicks)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गरुडाने जंगलात सशाची शिकार केल्याचा व्हिडीओही काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर व्हायरल झाला होता. गरुडाने शिकार केलेल्या सश्यासोबत आकाशात एकप्रकारे खेळच सुरु केला होता. एका पायाने सशाला आकाशात सोडून पुन्हा दुसऱ्या पायाने तो सशाला उचलत असे. यावरुन गरुडाची नजर किती तीक्ष्ण असते, याचा अंदाज लावता येईल. समुद्रातील माशालाही अगदी सहजपणे गरुडाने त्याच्या जाळ्यात अडकवलं. मासा पाण्यात जाण्यासाठी तडफडतो पण गरडाने त्याच्या पायांमध्ये माशाला घट्ट पकडलेलं असतं. त्यामुळे माशाला त्याचा जीव वाचवता येत नाही आणि गरुड माशाला घेऊन आकाशात उडून जात असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.