scorecardresearch

केअरटेकरला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने धावला हत्ती, हा VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल

हत्तीबद्दल बोलायचं झाल्यास या प्राण्याला आपल्या केअरटेकरबद्दल विशेष आपुलकी असते. त्यांचा केअरटेकर अडचणीत असल्याचं दिसल्यानंतर हत्ती आपला जीव धोक्यात घालतात. असाच आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही भावूक व्हाल हे मात्र नक्की.

Elephant-Viral-Video
(Photo: Instagram/ pubity)

जगभरात अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी आणि विविध जीव अस्तित्वात आहेत. यातील काही शिकारी असतात तर काही माणसांचे अतिशय चांगले मित्र असतात. कुत्रा, घोडा, हत्ती हे असे प्राणी आहेत, जे मोठ्या प्रमाणात पाळले जातात आणि माणसांसोबत त्यांचं अगदी जवळचं नातं असतं. विशेषतः हत्तीबद्दल बोलायचं झाल्यास या प्राण्याला आपल्या केअरटेकरबद्दल विशेष आपुलकी असते. त्यांचा केअरटेकर अडचणीत असल्याचं दिसल्यानंतर हत्ती आपला जीव धोक्यात घालतात. असाच आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही भावूक व्हाल हे मात्र नक्की.

हत्ती हा अत्यंत शांत प्रवृत्तीचा प्राणी आहे. तो शांतपणे आपलं आयुष्य जगणं पसंत करतो. तुम्ही आपलं काम करा, मी माझं काम करतो अशा आवेगात तो वावरतो. एखाद्या वेळेस कोणाला मदत लागली तर तो धावत जाऊन त्याची मदत करतो. याचीच प्रचिती देणारा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती केअरटेकरसोबत काहीतरी प्लॅन करताना दिसून येतोय. त्याच्या हत्तीसमोर केअरटेकरला मारण्याची अॅक्टिंग करण्याबद्दल या दोघांचा प्लॅन असतो.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : दबंग लेडी….एका हातात पिस्तुल, दुसऱ्या हातात काठी घेऊन फिरत होती, कारण ऐकून हैराण व्हाल!


दोघांमध्ये ठरल्याप्रमाणे हत्तीसमोर तो केअरटेकरला मारण्याचा प्रयत्न करत असतो. हे तिथे असलेला हत्ती पाहतो आणि आपल्या केअरटेकरला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने पळू लागतो. हत्तीला इतक्या आक्रमकतेने येताना पाहून केअरटेकरला मारणारा व्यक्ती तिथून घाबरून पळून जातो.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बाबो..! चालत्या बाईकवर केला डेंजरस स्टंट अन् धापकन खाली कोसळला…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : शाळेच्या गेटवरच मुली आपआपसात भिडल्या, पार एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, फ्री स्टाईल हाणामारीचा VIDEO VIRAL

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर pubity नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हायरल व्हिडीओसोबत लिहिलेल्या कॅप्शननुसार या हत्तीचं वय अवघे १७ वर्षे इतकं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. आतापर्यंत १६ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला पाहिलंय. तर अनेक युजर्सनी या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Elephant came to rescue her caretaker in viral video prp

ताज्या बातम्या