Viral video: आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल. अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. स्वत:ला विसरून मुलांना घडविणारी, त्यांच्यावर संस्कार करणारी असते ती आई. मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते, असे म्हणतात. मुलांचे आयुष्य मार्गी लागावे म्हणून अहोरात्र वाटणाऱ्या काळजीमध्ये, मुलांवर आलेल्या कोणत्याही संकटांशी सामना करण्यासाठी असलेल्या मातृशक्तीमध्ये. मात्र परिस्थितीमुळे किंवा अचानक आलेल्या संकटांमुळे कधी कधी अशी वेळ येते की आई आणि मुलांची ताटातूट होते. यात कधीकधी प्राण्यांचीही ताटातूट होते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे.

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर काही व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात. जगात माणुसकी शिल्लक राहिली नाही असं अनेकदा आपण म्हणत असतो. पण काही व्हिडीओ असे असतात ते पाहून कुठेतरी खरंच माणुसकी अजूनही आहे हे सिद्ध होतं. असाच माणुसकीचं दर्शन घडवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.एका हरणाचं पिल्ली त्याच्या आईपासून हरवलं होतं, याच हारणाच्या पिल्लाची आणि आईची एका तरुणानं भेट घालून दिली आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीने हरवलेल्या हरणाच्या पिल्लाची आपल्या आईशी भेट करून दिल्याचे दिसून आले. अनेकदा जंगलातून पिल्ले आपल्या आईपासून वेगळी होतात आणि हरवतात आणि बराच शोध घेऊनही आईला त्यांना शोधता येत नाही. असेच काहीसे एका हरणाच्या पिल्लासोबत घडले, जो त्याच्या आईपासून वेगळा झाल्यानंतर जंगलात हरवला. आईने त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तो सापडला नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती हरवलेल्या हरणाला वाचवून त्याच्या आईकडे परत घेऊन जात असल्याचे दिसते. पिल्लू त्याला जमिनीवर ठेवताच आधी व्यक्तीकडे पाहू लागतो तर दुरूनच आई आपल्या पिल्लाला पाहून आनंदित झाली असते. ती हळूहळू पुढे आणि व्यक्ती तिच्या पिल्लाला उचलून त्याच्याकडे आईजवळ त्याला ठेवून देतो. आई हे सर्वच पाहते आणि यावेळी तिचे डोळे कृतज्ञेने भरल्याचे दिसून येते जाणून ती व्यक्तीचे मनापासून आभार मानत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडिआवर हा व्हिडीओ @awkwardgoogle नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, माणूसकी आजूनही जिवंत आहे, तर आणखी एकानं, “यापेक्षा मोठं पुण्य असूच शकत नाही मित्रांनो हे समजून घ्या”